Dhananjay Munde : कंपन्या गुजरातला पळवल्या… आता देव पळवतात

Dhananjay Munde : कंपन्या गुजरातला पळवल्या… आता देव पळवतात

पिंपरी : भाजप-शिंदे सरकार आल्यावर येथील कंपन्या गुजरातला पळवल्या. आता देव पण पळवत आहे. भीमाशंकरही आसामला पळवल जात आहे. आमचं परळीच जोतिर्लिंग झारखंडला गेलं. हिंगोलीच औंढा नागनाथ गुजरातला नेलं. विठ्ठल जरी बाहेर पळवून नेला तरी हे म्हणतील आपण तिरुपती आणू, असा भजपला (BJP) खोचक टोला लगावत सुरतेचा इतिहास माहिती होता. मात्र आता सत्तेसाठी लोटांगण घातलं जात आहे. हे सरकार बनत असतात बनवाबनवी अन पळवापळवी बघायला मिळाली. लोकशाही वाचवायची असेल तर ही चिंचवड पोटनिवडणूक जिंकायला हवी. खरंतर महाविकास आघाडी सरकार खोक्यामुळे पडलं आहे, असा आरोप भाजप आणि शिंदे गटावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केला.

https://www.youtube.com/watch?v=1ZTETdWcueg

चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे बोलत होत. धनंजय मुंडे म्हणाले की, नासबंदीतही भाजपने घोटाळा केला. मराठवाड्यातून अनेकजण येथे पोट भरायला येतात. हे फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विकास कामामुळे होत आहे. त्यामुळे परतफेड करण्याची वेळ आली आहे. बारामती पेक्षा जास्त प्रेम अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरावर केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून द्यावा.

खरंतर चिंचवड पोटनिवडणूक ही लागायला नको होती. मात्र, लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने ही निवडणूक लागली. ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा लक्ष्मण जगताप यांच्या डोक्यावर हात होता. तो त्यांचा उत्कर्षाचा काळ होता. भाजपमध्ये गेल्यावर काय झालं, हे आपण पाहत आहे, असा टोला धनंजय मुंडे यांनी भाजपला यावेळी लगावला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube