कांद्याला अग्निडाग! राजकारण्यांना अनोखं निमंत्रण, निमंत्रण पत्रिका व्हायरल

  • Written By: Published:
कांद्याला अग्निडाग! राजकारण्यांना अनोखं निमंत्रण, निमंत्रण पत्रिका व्हायरल

नाशिक : कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यात अनेक अडचणींवर मात करत शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पादन घेतले. मात्र कांद्याचे (Onion) सरासरी बाजार भाव पाचशे रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले. देशांतर्गत मागणीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. तसेच विदेशात कांद्याला मागणी नाही. त्यामुळे दररोज कांद्याच्या बाजारभावात घसरण होत आहे. परिणामी, साठ ते सत्तर हजार रुपये एकरी केलेला उत्पादन खर्च निघेनासा झाला आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांच्या (Onion Farmer) डोळ्यात कांद्याने पाणी आणले. दरम्यान, अनेकदा आंदोलन करून, रसत्यावर उतरुण शेतकऱ्यांनी कांद्याला भाव देण्यामी मागणी केली. तरीही सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दखल घेतली नाही. दरम्यान, आता सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नाशिक जिल्ह्यात कांद्याची होळी (holi) करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.

सद्यस्थितीत रोज मरे त्याला कोण रडे अशी, गत कांदा उत्पादकांची झाली आहे. निसर्ग, सरकार आणि बाजार असा तिघांकडूनही कांदा उत्पाद मार खात आहे. सध्या कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. गेल्या कित्येक दिवसापासून कांद्याचं करायच काय हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. लाल कांदा सध्या बाजारामध्ये येतोय. मात्र या कांद्याला कवडीमोल रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे. अशातच नाशिकच्या येवला तालुक्यातील कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहत अग्निडाग कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे.

येत्या 6 मार्च रोजी कांदा अग्निडाग समारंभ आयोजित केला आहे. डोंगरे यांच्या कांद्याच्या अग्निडाग समारंभाची निमंत्रण पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लग्न पत्रिकेसारखी काढलेल्या समारंभाच्या पत्रिकेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय आरोग्य मंत्री हे उपस्थित राहणार असल्याचे नमूद केले आहे. तसेच त्यांच्या आशिर्वादाने कार्यक्रम संपन्न होणार असल्याचे म्हटलं आहे. हा समांरभ मातुलठाण (नगरसुल – मातुलठाण रोड (ता. येवला, जिल्हा नाशिक) येथे आयोजित केला आहे. होळीच्या दिवशी होणाऱ्या या संमारंभात शेतकरी कांद्याची होळी करणार आहेत.

Health Tips : अहो अश्चर्यम् ! भात खाऊनही तुम्हा वजन कमी करू शकता 

मुख्यमंत्र्याना लिहिलेल्या पत्रात त्यांनी लिहिलं की, शेतकऱ्यांपुढे अनेक प्रश्न असताना त्याला कांदा रडवतो आहे. कांदा एवढ्या कमी दरात जात असल्याने उत्पादन खर्च वसूल होत नसून केंद्रातील भाजपाचे धोरण शेतकरीविरोधी आहे. आपण शेतकऱ्याचे पुत्र असून या विरोधात आवाज उठवणे आवश्यक आहे. मात्र आपणही गप्प का? असा सवाल विचारला आहे. आपण काही करु शकत नसाल तर आयोजित केलेल्या कांदा अग्नीडाग कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन या पत्राद्वारे केले आहे.

रक्ताने लिहिलेल्या पत्रिकेतील मजकूर असा

समारंभाची तारीख 6 मार्च 2023 होळीच्या मुहूर्तावर करण्याचे योजले असून या अशुभंगल प्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे

आशिर्वाद – भाजप सरकार

प्रमुख अतिथी –
मा. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
मा. सौ. भारतीताई पवार, केंद्र आरोग्य कल्याण मंत्रालय

प्रेक्षक – महाराष्ट्रातील सर्व मीडिया

संयोजक – महाराष्ट्रातील सर्व शेतकरी

व्यवस्थापक –महाराष्ट्रातील सर्व शेतकरी मित्र परिवार

निमंत्रक-
कृष्णा भगवान डोंगरे
सौ. ज्योती कृष्णा डोंगरे

समारंभ ठिकाण – मातुलठाण नगरसुल, मातुलठाण

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube