Ajit Pawar News : राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) असे दोन गट पडले आहेत. फुटीनंतर अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह देण्यात आलं आहे. मात्र, राजकीय वर्तुळात भविष्यात अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येऊ शकतात अशा चर्चा सुरु असतात. या चर्चांना अखेर अजित पवार यांनी फुलस्टॉप देऊन टाकला आहे. पुण्यातील मेळाव्यात बोलताना अजित पवार थेट बोलले आहेत.
टीम इंडियाचा खेळाडू झहीर खाननं आपल्या मराठमोळ्या भाषणानं परळीकरांची जिंकली मनं…
सध्याचं राजकारण पाहता शरद पवार गटाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या शिरुर मतदारसंघावरुन अजित पवार आणि कोल्हे यांच्यात चांगलंच वाकयुद्ध सुरु आहे. त्यातच आज पुण्यातील शिरुरमध्ये आज अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात खासदार अमोल कोल्हे यांच्यावर अजित पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. त्याचवेळी बोलताना अजित पवार म्हणाले, अमोल कोल्हेंना मीच मते द्यायला सांगितलं होतं, तेव्हाची आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. आता सरळ सरळ फाटा पडला आहे. आम्ही इकडे आणि ते तिकडं असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.
‘वंचित’बरोबर आघाडी होणार? वडेट्टीवार म्हणाले, आता दोन दिवसांत तिन्ही पक्ष…
तसेच काही जण म्हणतात हे कधीही एकत्र येतील का रं…त्यांनीच आमचं निम्म गार होत आहे. हळूच दबकत दबकत विचारायचं दादा पुढे काही होईल का? लोकांच्या मनात अजूनही शंका आहेत, तर मी स्पष्ट सांगतो असं काहीही होणार नाही, असं अजित पवार यांनी शरद पवार-अजित पवार यांच्या एकत्र येण्यावर स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, निवडून आल्यावर अमोल कोल्हे राजीनामा घेऊन आले होते. मी म्हटले लोकांनी तुम्हाला पाच वर्षांसाठी निवडून दिले. असा मध्येच राजीनामा दिला. तर लोक जोड्याने मारतील आपल्याला. ते म्हणाले, मी कलावंत आहे. माझे नाटक, चित्रपट, मालिका असतात. त्यावर परिणाम होतो. तेव्हा मी त्यांना सांगितलं हे बरोबर नाही. असं करू नका. त्यावर ते म्हटले की, मी सेलिब्रेटी आहे. लोकांना मी मतदार संघात यावं वाटतं. पण यामुळे माझ्या व्यवसायावर परिणाम होतो. मला बाकी सर्वजण म्हणायचे की, तूच त्यांना पक्षात आणले. तर तूच त्यांना समजावून सांग. हे सर्व मी अमोल कोल्हे यांच्या तोंडावर खरं खोटं करू शकतो. त्यामुळे अमोल कोल्हे यांचा राजकारण हा पिंडच नाही. आम्ही राजकारणी लोक एखादा उमेदवार आम्हाला पराभूत करता येत नसेल तर सेलिब्रेटी काढतो. अशी कबुली देखील यावेळी अजित पवारांनी दिली.