अजित पवारांना मोठा धक्का, लोणावळ्यात 137 जणांचे सामूहिक राजीनामे, नेमकं काय घडलं?

  • Written By: Published:
अजित पवारांना मोठा धक्का, लोणावळ्यात 137 जणांचे सामूहिक राजीनामे, नेमकं काय घडलं?

Lonawala NCP : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Central Election Commission) कधीही होऊ शकते. त्यामुळे जागावाटपाबाबत अजित पवार (Ajit Pawar) गटाची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार गटाची 5 आणि 6 तारखेला जागावाटपाबाबत मॅरेथॉन बैठक होणार आहे. अशातच लोणावळ्यात (Lonawala) अजित पवार यांच्या गोटात प्रचंड नाराजी असल्याची माहिती समोर आली आहे. या नाराजीमुळे आतापर्यंत 137 जणांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

Dabba Cartel : भक्षकनंतर सईची सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला; ड्रग्स स्मगलिंगचा ‘डब्बा कार्टेल’ टीझर रिलीज 

अजित पवार राज्यभर निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची जमवाजमव करत आहेत. तर दुसरीकडे, मावळ तालुक्यातील अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेल्या लोणावळ्यातील राष्ट्रवादीच्या १३७ कार्यकर्त्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याचं सांगून हे राजीनामे दिले आहेत. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्तक्षेपावर नाराजी व्यक्त करत सर्वांनी राजीनामे दिले आहेत. विशेषत: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

जागावाटपावरून महायुतीत खटके! शिवसेनाला २३ जागा मिळाव्यात, अन् धनुष्यबाण चिन्हावरच…; संजय मंडलिकांचे विधान 

विनोद होगले हे लोणावळा युवा शहराध्यक्ष होते. आमदाराने लोणावळा युवक शहराध्यक्षपद दुसऱ्याला दिले आणि पक्ष संघटनेत डावलत असल्याचा आरोप करत महिला, युवती, तरुणांनी राजीनामे दिलेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या मावळ आणि पुणे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज राजीनामा देणाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण तरीही राजीनामा देणारे लोक आपल्या निर्णयावर ठाम आहेत. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत, आम्ही राजीनामा दिला आहे. 20 ते 25 वर्षे पक्षाचं काम केलं, आम्हाला डावलून इतरांना संधी का, असा सवाल त्यांनी केला.

लोणावळा युवक शहराध्यक्षपदी मंगेश मावकर यांना संधी देण्यात आली आहे. त्यांना काही अनुभव नसतानाहीही संधी देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. आम्ही राष्ट्रवादी पक्षासोबत होतो. पण आता आम्हाला निर्णय घ्यावा लागला. आम्ही लवकरच पुढील पाऊल उचलू. पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्यचाी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज