… तर यशस्वी जैस्वालवर 4 सामन्यांची बंदी; रहाणेने केला सर्वात मोठा खुलासा

Ajinkya Rahane On Yashasvi Jaiswal : नुकतंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणारा भारताचा स्टार खेळाडू अजिंक्य रहाणेने युवा

Ajinkya Rahane On Yashasvi Jaiswal

Ajinkya Rahane On Yashasvi Jaiswal

Ajinkya Rahane On Yashasvi Jaiswal : नुकतंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणारा भारताचा स्टार खेळाडू अजिंक्य रहाणेने युवा फलंदाज यशस्वी जैस्वालबद्दल मोठा खुलासा केला आहे. यानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. द इंडियन एक्सप्रेल ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजिंक्य रहाणेने 2022 च्या दुलीप ट्रॉफीच्या एका सामन्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. या सामन्यात पंचांनी वारंवार सूचना देऊनही जैस्वाल साऊथ झोन च्या टी.रवी तेजाशी वाद घातल राहिला होता.

तर दुसरीकडे वेस्ट झोनचा कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) जैस्वालला वाद घालू नको अशी वारंवार समज देत होता मात्र जैस्वाल ऐकत नसल्याने रहाणेने त्याला काही काळासाठी ड्रेसिंग रुममध्ये परत पाठवले होते. यावर बोलताना राहणेने सांगितलं की, जर त्याने ते पाऊल उचलले नसते तर जैस्वालवर चार सामन्यांची (2022 Duleep Trophy) बंदी घालण्यात आली असती असा खुलासा रहाणेने या मुलाखतीमध्ये केला आहे.

या मुलाखतीमध्ये रहाणे म्हणाला की, खेळात स्लेजिंग होते आणि ते व्हायला हवे असे मला वाटते. त्यामुळे खेळात थोडी मजा येते. त्या वेळी यशस्वीला ( Yashasvi Jaiswal) कदाचित वाईट वाटले असेल. पण आपण अशी अनेक उदाहरणे पाहिली आहेत जिथे खेळाडूंवर बंदी घातली गेली आहे आणि परिस्थिती किती वेगाने बदलू शकते हे सांगता येत नाही.

एक संधी हातातून निसटली की नशीब बदलते, काहीच सांगता येत नाही. मला परिस्थितीचे गांभीर्य समजले आणि दोन्ही खेळाडू मर्यादा ओलांडत आहेत असे वाटले. माझ्या सहकाऱ्याला आवरणे ही माझी जबाबदारी होती.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अंतर्गत वाद? प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेवर गंभीर आरोप-

तो पुढे म्हणाला, सामना पंच चार सामन्यांच्या बंदीची तयारी करूनच आले होते. त्यासाठीचे पत्रही तयार होते. ते माझ्याकडे आले आणि म्हणाले, ‘हे बघ पत्र, पण तू जे केलेस त्यामुळे मी ते फाडून टाकत आहे. त्यांनी माझ्यासमोरच ते पत्र फाडून टाकले शेवटी, मला आनंद आहे की जैस्वालवर सामन्यांची बंदी आली नाही आणि तो आता भारतासाठी खेळत आहे. काय झाले असते? कदाचित त्यानंतर तो खेळला नसता किंवा कदाचित खेळलाही असता. तो एक दर्जेदार खेळाडू आहे. मी त्याचे श्रेय हिरावून घेत नाहीये. पण काहीच सांगता येत नाही.

Exit mobile version