अंजिक्य रहाणेचा आयपीएलमध्ये प्लॉप शो ! सलामीला भोपळा न फोडणाऱ्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर

Ajinkya Rahane-इडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या लढतीत रहाणेने केवळ दोन चेंडूंचा सामना केला आणि एकही धाव न काढता तो बाद झाला.

  • Written By: Published:
Ajinkaya Rahane

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हा आयपीएलमधील अनुभवी फलंदाज आहे. पण तो सातत्याने अपयशी ठरलाय. आता त्याच्या नावावर आयपीएलमधील (IPL) एक नकोसा विक्रम नोंदविला गेलाय. कालच्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यातही कोलकाता नाईट रायडर्सचा ( kolkata night riders) कर्णधार अजिंक्य रहाणे हा पुन्हा एकदा एकही धाव काढू शकला नाही. त्यामुळे आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळेस शुन्यावर बाद होणाऱ्या तो पहिला सलामीचा फलंदाज ठरला आहे.

इडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या लढतीत रहाणेने केवळ दोन चेंडूंचा सामना केला आणि एकही धाव न काढता तो बाद झाला. हा सलग दुसरा सामना होता ज्यात त्याला आपले खाते उघडता आले नाही. त्याने पार्थिव पटेलला मागे टाकले आहेत. आयपीएलच्या इतिहासात सलामीवीर म्हणून सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा खेळाडू बनण्याचा मान मिळवला. पार्थिव आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून 11 वेळा शून्यावर बाद झाला होता. आता सलामीवीर म्हणून रहाणे 12 वेळा शून्यावर बाद झाला आहे.

रहाणे नंद्रे बर्गरचा बळी ठरला
डावाच्या दुसऱ्या षटकात नंद्रे बर्गरच्या एका शॉर्ट बॉलवर कट शॉट मारण्याचा प्रयत्न करताना अजिंक्य रहाणे बाद झाला. चेंडू बॅटची कड घेऊन यष्टीरक्षक ध्रुव जुरेलच्या हातात गेला. या धक्क्याने केकेआरच्या डावाला सुरुवातीलाच खीळ बसली आणि संघाने पहिल्या आठ चेंडूमध्ये दोन विकेट गमावल्या आहेत. 2026 चा हंगाम खूपच खराब राहिला आहे. त्याची फलंदाजीची कामगिरीही अत्यंत निराशाजनक राहिली आहे. त्याने पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावले, पण त्यानंतर तो सलग सहा सामन्यांमध्ये अपयशी ठरला आहे. केवळ आतापर्यंतच्या सामन्यात केवळ एकच विजय मिळविता आला आहे.

सलामी जोडीवर अशीही नामुष्की
कोलकाताचे दोन्ही सलामीवीरांची राजस्थान रॉयल्सविरुद्ध निराशाजनक कामगिरी राहिली आहे. रहाणेच्या आधी, टीम सेफर्टही शून्यावर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला होता. आयपीएलच्या इतिहासात दोन्ही सलामीवीर शून्यावर बाद होण्याची ही 13 वी वेळ आहे. यापूर्वी 2014 मध्ये केकेआरसोबत असे घडले होते, जेव्हा गौतम गंभीर आणि जॅक कॅलिस हेदेखील शून्यावर बाद झाले होते.

कर्णधारपद सोडण्यासाठी अजिंक्य रहाणेवर दबाव
अजिंक्य रहाणेची कामगिरी चांगली झालेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर क्रिकेट वर्तुळातून जोरदार टीका होत आहे. त्याचबरोबर केकेआरचे कर्णधारपद सोडण्यासाठी त्याच्यावर दबाव वाढत आहे.

follow us