Download App

टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठी अजून किती वाट पाहावी लागणार, या 5 खेळाडूकडे निवडकर्त्यांनी केले दुर्लक्ष

  • Written By: Last Updated:

भारतीय संघ पुढील महिन्यात वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. 2 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामन्यांनंतर दोन्ही संघांमध्ये 5 टी-20 सामने खेळवले जातील. कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. वनडेसाठी 17 खेळाडूंची तर कसोटीसाठी 16 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. मात्र, त्यात असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांना संघात स्थान मिळू शकले असते. मात्र निवड समितीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. आम्ही तुम्हाला अशाच 5 नावांबद्दल सांगणार आहोत.(5-players-who-deserved-place-in-team-india-on-west-indies-tour-selectors-ignored)

वॉशिंग्टन सुंदर (ODI)

वॉशिंग्टन सुंदर 2023 च्या सुरुवातीपर्यंत भारतीय एकदिवसीय संघाचा भाग होता. मात्र त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. 16 सामन्यात 16 विकेट्स घेण्यासोबत सुंदरने 29.12 च्या स्ट्राइक रेटने 233 धावाही केल्या आहेत. तरीही त्याची वनडे संघात निवड झाली नाही. 2021 मध्येही त्याला अखेरची कसोटी खेळण्याची संधी मिळाली होती.

सूर्यकुमार यादव (कसोटी)

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादवने भारताकडून कसोटी पदार्पण केले. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील राखीव खेळाडूंमध्येही त्याचा समावेश होता. मात्र आता त्याला संघातून पूर्णपणे वगळण्यात आले आहे. सूर्याला कसोटी संघाचा एक्स फॅक्टर म्हटले जात आहे, पण त्याला स्वत:ला सिद्ध करण्याची संधीही देण्यात आली नाही.

अर्शदीप सिंग (ODI)

अर्शदीप सिंगने टी-20 मध्ये भारतासाठी अप्रतिम खेळ दाखवला आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याला गेल्या वर्षी न्यूझीलंड दौऱ्यावर तीन सामने खेळायला मिळाले. वर्षाच्या सुरुवातीला त्याला संघातही स्थान देण्यात आले होते पण आता त्याला बाहेर केले आहे. 2013 मध्ये भारताकडून शेवटचा एकदिवसीय सामना खेळणाऱ्या जयदेव उनाडकटला संघात स्थान मिळाले आहे.

वेस्टइंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा.. पाहा कोणाला संधी, कोणाला डच्चू?

अभिमन्यू ईश्वरन (कसोटी)

बंगालचा सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन भारतीय संघात दीर्घकाळापासून आहे. तो राखीव संघातील मुख्य संघाचा एक भाग होता. मात्र या 27 वर्षीय खेळाडूला भारतीय संघात अध्याप खेळण्याची संधी मिळाली नाही. आता ईश्वरनला वगळल्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि रुतुराज गायकवाड या दोन युवा फलंदाजांचा संघात प्रवेश झाला आहे. इश्वरनच्या फर्स्ट क्लासमधील अनुभवासमोर ते दोघेही कुठेच टिकू शकत नाही.

सर्फराज खान (कसोटी)

सर्फराज खानला कधी संधी मिळणार हाच प्रश्न सर्वजण विचारत आहेत. 37 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये सरफराजच्या 79.65 च्या सरासरीने 3505 धावा आहेत. त्याने 13 शतके ठोकली आहेत. तो रणजीमध्ये धावा करत आहे. यानंतरही मुंबईच्या या खेळाडूंना पुन्हा एकदा कसोटी संघात संधी देण्यात आली नाही.

Tags

follow us