Download App

Cricket : बांगलादेशचा पराभव करून अफगाणिस्तानने रचला इतिहास, प्रथमच जिंकली मालिका

  • Written By: Last Updated:

सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी शानदार शतके झळकावल्यानंतर मुजीब उर रहमान आणि फझलहक फारुकी यांच्या घातक गोलंदाजीमुळे अफगाणिस्तानने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशचा 142 धावांनी पराभव केला. यासह अफगाणिस्तानने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेत मालिका जिंकली. अफगाणिस्तानने प्रथमच बांगलादेशविरुद्ध वनडे मालिका जिंकली आहे. (afghanistan beat bangladesh 2nd odi win series first time zahur ahmed chowdhury stadium chattogram)

दोन्ही सलामीवीरांच्या शतकी खेळीमुळे अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 9 गडी गमावून 331 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 43.2 षटकांत 189 धावांत सर्वबाद झाला. अफगाणिस्तानकडून फजलहक फारुकी आणि मुजीब उर रहमान यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.

बांगलादेशकडून वरिष्ठ फलंदाज मुशफिकुर रहीमने सर्वाधिक 69 धावा केल्या. मेहंदी हसन मेराज आणि शाकिब अल हसन यांनी 25-25 धावा केल्या. त्याचवेळी सहा फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. सलामीवीर मोहम्मद नईमने 21 चेंडूंत 9 धावा केल्या तर लिटन दासने 3 चौकारांच्या मदतीने 13 धावा केल्या. यानंतर नजमुल हुसेन शांतो 01 आणि तौहीद हृदयी 16 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. शाकिबने 25 धावा केल्या, तर अफिफ खातेही उघडू शकला नाही.

BCCI Policy : परदेशी लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना बीसीसीआयचा दणका; आणणार नवी पॉलिसी

रहिम आणि मेहंदी यांनी 72 धावांत 6 विकेट्स पडल्यानंतर बांगलादेशचा डाव 159 धावांवर नेला, मात्र ही भागीदारी तुटताच. पुन्हा एकदा संपूर्ण संघ पत्त्यासारखा विखुरला गेला आणि संपूर्ण संघ 189 धावा पर्यंत मजल मारूशकला .

अफगाणिस्तानकडून फजलहक फारुकी आणि मुजीब उर रहमान प्रत्येकी 3 यांच्याशिवाय राशिद खानने 2 बळी घेतले. याशिवाय मोहम्मद नबीला एक विकेट मिळाली. तत्पूर्वी, रहमानउल्ला गुरबाजने फलंदाजी करताना 145 धावांची खेळी केली. गुरबाजची वनडेतील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याचा सहकारी सलामीवीर इब्राहिम झद्रानने 100 धावा केल्या. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 256 धावांची विक्रमी भागीदारी केली.

Tags

follow us