BCCI Policy : परदेशी लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना बीसीसीआयचा दणका; आणणार नवी पॉलिसी

BCCI Policy : परदेशी लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना बीसीसीआयचा दणका; आणणार नवी पॉलिसी

BCCI Policy : बीसीसीआयच्या अॅपेक्स काऊन्सिलची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीमध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या पुढच्या सीजनसाठी इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले. त्याचबरोबर भारतीय खेळाडूंनी विदेशी टी20 लीगमध्ये खेळण्यासंदर्भात चर्चा झाली. तसेच चीनमध्ये होणाऱ्या एशियन गेम्समध्ये टीम इंडियाचा सहभाग आणि वर्ल्ड कप अगोदर स्टेडिअम अपग्रेडेशनसंदर्भात देखील निर्णय घेण्यात आले. ( BCCI new policy for retired players playing in overseas T20 leagues)

तोंडामध्ये अंजीर अन् हातात खंजीर ही माणसं बेभरवशाची; अजितदादांसमोर शिंदेंची टोलेबाजी

रिटायर्ड खेळाडूंसाठी आणली नवी पॉलिसी
गेल्या काही दिवसांपासून भारतीय खेळाडुंनी विदेशी लीग्जमध्ये खेळण्याची मागणी केली जात आहे. मात्र खेळाडुंना तशी परवानगी नाही. मात्र त्यातही काही रिटायर्ड खेळाडू विदेशी लीग्जमध्ये खेळतात. त्यामुळे त्यासाठी आता पॉलिसी तयार करण्यात येणार आहे. जेणे करून विदेशी लीगमध्ये खेळण्यासाठी देशातील चांगले खेळाडू लवकर रिटायरमेन्ट घेऊ नये.

छगन भुजबळांना ओळखण्यात माझी चूक झाली… नाशिकमध्ये शरद पवारांची जाहीर कबुली

अनेक देशांमध्ये हा प्रकार सुरू आहे. विदेशी लीगमध्ये खेळण्यासाठी देशातील चांगले खेळाडू लवकर रिटायरमेन्ट घेत आहेत. त्यामुळे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितलं की, अशा रिटायरमेन्ट रोखण्यासाठी आम्ही लवकरच नियमावली आणणार आहोत. 1-2 महिन्यात ही नियमावली आणण्यात येईल. तसेच ती अॅपेक्स काऊन्सिलच्या मंजुरीसाठी पाठवली जाईल. असं देखील त्यांनी सांगितलं.

सध्या अनेक भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून रिटायरमेन्ट घेतात. त्यानंतर ते विदेशी लीगमध्ये खेळण्यासाठी जातात. यामध्ये इरफान आणि यूसुफ पठान, पार्थिव पटेल, श्रीसंत आणि स्टुअर्ट बिन्नी जिम एफ्रो टी10 लीगमध्ये खेळतात. अंबाती रायडू यूएसएमध्ये मेजर लीग क्रिकेटमध्ये खेळतो. रॉबिन उथप्पा आणि यूसुफ पठानने ILT20 मध्ये भाग घेतला. यातील अनेक खेळाडू भारतीय क्रिकेटचे स्टार राहिले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube