Download App

Team India : टी 20 मालिकेत ‘हा’ संघ पहिल्यांदाच टीम इंडियाला भिडणार; वेळापत्रक जाहीर

Team India : विश्वचषक गमावल्यानंतर आता टीम इंडिया (Team India) ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेनंतर नवीन वर्षात टीम इंडिया नवख्या संघाविरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठीही वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या मालिकेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यात ही स्पर्धा सुरू होणार आहे. अफगाणिस्तान विरुद्ध टी 20 मालिका खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. अफगाणिस्तान क्रिकेट (Afghanistan) बोर्डाने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे. या मालिकेसाठी अफगाणिस्तान टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेतील तीन सामने इंदूर, मोहाली आणि बंगळुरू येथे होतील.

IND vs AUS Final : ऑस्ट्रेलिया जिंकला पण वॉर्नरनं मागितली माफी; नेमकं काय घडलं ?

पहिला सामना 11 जानेवारी, दुसरा सामना 14 जानेवारी तर अंतिम सामना 17 जानेवारी रोजी होईल. याआधी टीम इंडिया आणि अफगाणिस्तान एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट सामन्यात खेळले आहेत. टी 20 मध्ये मात्र पहिल्यांदाच भिडणार आहेत. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत चार एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या चारपैकी तीन सामन्यात भारताने विजय मिळवला तर एक सामना बरोबरीत राहिला. अफगाणिस्तानला अद्याप एकदाही विजय मिळवता आलेला नाही. त्यानंतर आता अफगाणिस्तान पहिल्यांदाच टी 20 सामना भारताविरोधात खेळणार आहे.

उद्यापासून भारत-ऑस्ट्रेलिया टी 20 मालिका 

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS) 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील पहिला सामना 23 नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणम येथे होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची (India Squad) घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) असेल. तर ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad) उपकर्णधाराच्या भूमिकेत असेल. याशिवाय रोहित शर्मा आणि विराट कोहली या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

विशाखापट्टणम व्यतिरिक्त या मालिकेतील सामने तिरुअनंतपुरम, गुवाहाटी, नागपूर आणि हैदराबाद येथे होणार आहेत. त्याच वेळी, भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेचे सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजल्यापासून खेळवले जातील.

टीम इंडिया प्लेईंग-11
सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, टिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार

IND vs AUS Final : विश्वचषकाची फायनल, रोहित शर्माने केला एक खास विक्रम

Tags

follow us