अजिंक्य रहाणेने अचानक घेतला मोठा निर्णय, सर्वांना केले आश्चर्यचकित

भारतीय कसोटी संघात प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणेने आता आपल्या एका निर्णयाने सर्वांनाच चकित केले आहे. रहाणे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलमध्ये तब्बल 18 महिन्यांनंतर टीम इंडियात परतला. या सामन्याच्या दोन्ही डावात त्याने चांगली कामगिरी केली. भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी. यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत रहाणेला […]

5sporahane_cut_

5sporahane_cut_

भारतीय कसोटी संघात प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणेने आता आपल्या एका निर्णयाने सर्वांनाच चकित केले आहे. रहाणे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलमध्ये तब्बल 18 महिन्यांनंतर टीम इंडियात परतला. या सामन्याच्या दोन्ही डावात त्याने चांगली कामगिरी केली. भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी. यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत रहाणेला काही खास करता आले नाही. (ajinkya rahane takes break from cricket and not play for leicestershire team in one day cup)

वेस्ट इंडिज दौऱ्यावरून परतल्यानंतर अजिंक्य रहाणेने आता एकदिवसीय स्पर्धेत इंग्लंडच्या कौंटी क्लब लीसेस्टरशायरकडून खेळण्यास नकार दिला आहे. त्याने आपला निर्णय क्लबला सांगितला आहे, ज्यामध्ये रहाणेने क्रिकेटमधून छोटा ब्रेक घेतल्याची चर्चा केली आहे.

इंग्लंडची देशांतर्गत 50 षटकांची स्पर्धा ऑगस्टमध्ये सुरू होईल आणि सप्टेंबरपर्यंत चालेल. रॉयल लंडन वन-डे चषक स्पर्धेत, लीसेस्टरशायर संघाला 5 ऑगस्ट रोजी गट-ब मध्ये केंट संघाविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. रहाणेच्या या ब्रेकबाबत क्लबकडून निवेदनही जारी करण्यात आले आहे.

Asia Champion कुस्ती स्पर्धेत जामखेड गाजलं; सुजय तनपुरेला सुवर्णपदक

रहाणेच्या या निर्णयाचा आम्ही आदर करतो

अजिंक्य रहाणेच्या या निर्णयाबाबत लीसेस्टरशायर क्लबने एक निवेदन जारी केले आहे. त्यामध्ये क्लबच्या संचालकाने सांगितले की, रहाणेची परिस्थिती आम्हाला समजते आणि गेल्या काही महिन्यांपासून त्याचे वेळापत्रक खूप व्यस्त होते. त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याच्या त्याच्या निर्णयाचा आम्ही पूर्ण आदर करतो. रहाणेच्या जागी, क्लबने ऑस्ट्रेलियन खेळाडू पीटर हँड्सकॉम्बला आगामी स्पर्धेसाठी आपल्या संघाचा भाग बनवले आहे.

Exit mobile version