Download App

Ajit Agarkar; मराठमोळा अजित आगरकर निवड समितीचा अध्यक्ष, बीसीसीआयची घोषणा

India Chief Selector: भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि मराठमोळा अजित आगरकर याची भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचा अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. स्टिंग ऑपरेशनमध्ये अडकल्यानंतर भारतीय क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष चेतन शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता अजित आगरकरकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.

अजित आगरकर यांनी काही दिवसांपूर्वी आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्समधील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून तो भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचा अध्यक्ष होणार हे जवळपास निश्चित झाले होते. यापूर्वी त्याने मुंबई संघाचा निवड समितीचा अध्यक्ष म्हणून काम केले आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून गोलंदाज प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली होती. क्रिकेट सल्लागार समितीने ज्येष्ठतेच्या आधारावर (एकूण कसोटी सामन्यांची संख्या) पुरुष निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी आगरकरच्या नावाची शिफारस केली होती.

Pawar family crisis; शरद पवारांनीही केला होता थोरल्या भावाच्या विरोधात प्रचार

अजित आगरकरने 110 प्रथम श्रेणी, 270 लिस्ट ए आणि 62 टी-20 सामने खेळले आहेत. त्याच वेळी, त्याने देशासाठी 26 कसोटी, 191 एकदिवसीय आणि चार टी-20 सामने खेळले. 2007 मध्ये पहिला T20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो सदस्य होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम अजूनही त्याच्या नावावर आहे. त्याने हे अर्धशतक 2000 साली झिम्बाब्वेविरुद्ध 21 चेंडूत केले होते. त्याने केवळ 23 एकदिवसीय सामन्यांमध्ये 50 बळी मिळवले होते. गेल्या दशकभरात सर्वात कमी सामन्यांमध्ये ही कामगिरी करणारा तो गोलंदाज होता.

पुरुष निवड समिती : अजित आगरकर (अध्यक्ष), शिव सुंदर दास, सुब्रतो बॅनर्जी, सलील अंकोला, श्रीधरन शरथ.

Tags

follow us