Asia Cup 2023 : आशिषाई चषकाचा अंतिम सामना आज खेळवला जाणार आहे. आपल्या रफ्तार खेळीने भारत आणि श्रीलंका संघाने अंतिम सामन्याचं तिकीट मिळवलं असून अंतिम सामन्यासाठी आज दोन्ही संघात लढत होणार आहे. अंतिम सामन्यासाठी श्रीलंकेने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून काही वेळातच सामना सुरु होणार तितक्यात पावसाने व्यत्यय घातल्याने अद्याप सामना सुरु झालेला नाही.
हीच ती वेळ ! ‘सजा’कारांनाही शिक्षा द्या; दोघांचा उल्लेख करत राज ठाकरेंचा हल्लाबोल
आशिया कप वनडे फॉरमॅटमध्ये भारत आणि श्रीलंका दोन्ही संघ आत्तापर्यंत 20 वेळा आमनेसामने आले आहेत. आत्तापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये दोन्ही संघाचे रेकॉर्ड समसमान असल्याचं दिसून येतं, भारताने आत्तापर्यंत 10 सामने जिंकलेत तर 10 सामन्यात श्रीलंकेने भारताचा धूळ चारली आहे.
Asia Cup 2023 : पावसामुळे उद्या सामना झाला नाही तर भारत की श्रीलंका कोण ठरणार चॅम्पियन?
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.
दरम्यान, आत्तापर्यंत भारतीय संघाने सर्वाधिक 7 वेळा आशिया चषकाचा किताब उंचावला आहे. तर श्रीलंकेने सहावेळा आशिया चषक जिंकला आहे. गतवर्षी पाकिस्तानला पराभूत करून यजमान श्रीलंकेने दासुन शनाकाच्या नेतृत्वात ही किमया साधली होती. त्यामुळे आज आशियातील दोन यशस्वी संघात पुन्हा एकदा ‘आशियाई किंग्ज’ कोण हे सिद्ध करण्यासाठी सामना होणार आहे.