Asia Cup 2023: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला पुन्हा एकदा नामुष्कीचा सामना करावा लागला. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये लावलेल्या फ्लडलाइट्समुळे पीसीबीवर ही वेळ आली. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामना गद्दाफी स्टेडियमवर सुरु आहे. मात्र सामना सुरु असताना स्टेडियममधील लाईट गेली. त्यानंतर सामना काही वेळ थांबवावा लागला. सोशल मीडियावर मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची खिल्ली उडवली जात आहे.
पाकिस्तानी डावाच्या सहाव्या षटकात ही घटना घडली. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि सलामीवीर इमाम-उल-हक क्रीजवर होते. मात्र फ्लडलाइट्समध्ये बिघाड झाल्याने सामना थांबवावा लागला. मात्र, काही वेळाने पुन्हा स्पर्धा सुरू झाली. पण लाईव्ह मॅचदरम्यान स्टेडियममध्ये लाईट गेल्याने पाकिस्तान क्रिकेटला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. मात्र, सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स ट्रोल केले जात आहे.
‘जोपर्यंत समाजात भेदभाव, तोपर्यंत आरक्षण…’ सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
दरम्यान बांगलादेश प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला विजयासाठी 194 धावांचे लक्ष्य आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेशचा संघ 38.4 षटकांत सर्वबाद 193 धावांवर आटोपला. वृत्त लिहिपर्यंत पाकिस्तानी संघाने 30 षटकांत 2 बाद 142 धावा केल्या आहेत. फखर जमान आणि कर्णधार बाबर आझम पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. बांगलादेशकडून तस्किन अहमद आणि शरीफुल इस्लाम यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. इमाम-उल-हक 66 धावा करुन क्रीजवर आहे तर मोहम्मद रिझवान 36 धावांवर खेळत आहे. पाकिस्तानला विजयासाठी 20 षटकांत 53 धावांची गरज आहे.