Asia Cup : आशिया चषकाच्या (Asia Cup) रोमांचक सामन्यांना आजपासून (दि. 30) सुरूवात होणार असून, भारतीय संघाचा पहिला सामना 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरोधात होणार आहे. विश्वचषकापूर्वी खेळवल्या जाणाऱ्या आशिया चषकाकडे ड्रेस रिहर्सल म्हणून बघितले जात आहे. मात्र, आशिया चषकाला सुरूवात होण्यापूर्वीच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) स्वतःला ‘ऑल इज वेल’ म्हणत काय समजावण्याचा प्रयत्न करत आहे असा प्रश्न करोडो क्रिकेटप्रमींना पडला आहे.
कॉल सेंटर मोहीम अन् मिशन 350 प्लस; 2024 साठी भाजपचा ‘मायक्रो प्लॅन’
काही वर्षांपूर्वी आमिर खानचा 3 इडियट्स चित्रपट प्रदर्शित झाला होता. यातील एक जबरदस्त सीन म्हणजे आमिर खान, शर्मन जोशी आणि आर माधवन एका खोलीत बसलेले असतात. त्यावेळी आमिर खान म्हणतो की, ”ये जो अपना दिल है ना, बड़ा डरपोक है. इसको बेवकूफ बना कर रखो. लाइफ में कितनी भी बड़ी प्रॉब्लम हो उसको समझा कर रखो- सब ठीक है चाचू, ऑल इज वेल…ऑल इज वेल.” त्यावर शर्मन जोशी विचारतो की, याने प्रश्न सुटेल का? तर आमिर म्हणतो नाही, पण याने तुम्हाला समस्येला सामोरे जाण्याची हिंमत मिळेल.
आता तुम्ही म्हणाल की, रोहित शर्मा आणि ऑल इज वेलचा काय संबंध तर, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या याच सूत्रावर काम करत आहे. आशिया चषकापूर्वी त्याने केलेले एक विधान चर्चेत आहे. 2023 च्या विश्वचषकाबाबत त्याने हे विधान केले आहे. त्याच्या या विधानावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
Asia Cup 2023: बांगलादेश-अफगाणिस्तान बिघडू शकतात अनेक संघांचा गेम प्लॅन, असा आहे विक्रम
टीम इंडियाने बऱ्याच काळापासून कोणतीही मोठी स्पर्धा जिंकलेली नाही. पण या आव्हानांनंतरही रोहित शर्मा सर्व ठीक असल्याचे म्हणत आहे. संपूर्ण टीमबद्दल माहिती नाही पण सर्व काही ठीक असल्याचे म्हणत रोहित शर्मा स्वतःला आगामी स्पर्धांमध्ये येणाऱ्या आव्हानांसाठी तयार करतोय.
टीम इंडियासमोर असंख्य प्रश्न
गेल्या काही महिन्यांपासून प्रत्येक सामन्याकडे विश्वचषकाच्या प्रिझममधून पाहिले जात आहे. आशिया चषक ही विश्वचषकाची ड्रेस रिहर्सलही असून, नुकत्याच झालेल्या सामन्यांचा निकाल काय लागला, कोणत्या खेळाडूने काय केले, कोण फ्लॉप ठरले. या सगळ्याची नोंद प्रशिक्षक-कर्णधार-निवडकांच्या डायरीत केली जात आहे.
Asia Cup : अनफिट केएल राहुलची निवड अंगलट; ऐन सामन्यापूर्वी विश्रांती देण्याची नामुष्की
रोहित शर्मा समोरील आव्हाने नेमकी कोणती?
आता सर्वप्रथम आपण भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासमोरील आव्हाने समजून घेऊया. यात पहिलं आव्हान आहे ते, टीम इंडियात सलामीवीर फलंदाजीची जबाबदारी कोण पार पाडणार? चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार? यासह शुभमन गिल कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करेल? केएल राहुलच्या फिटनेसचे काय होणार? असे एक न अनेक प्रश्न रोहित समोर असून या प्रश्नांची उत्तरे सध्या तरी रोहितकडे नाहीत. त्यासाठी ऑल इज वेल म्हणत रोहित स्वतःला तयार करत आहे.
2019 आणि 2023 मधील फरक विसरतोय रोहित
रोहित शर्मा आगामी विश्वचषकापूर्वी खूप काही आठवण्याचा प्रयत्न करत आहे, पण सर्वात मोठी गोष्ट विसरत आहे ती म्हणजे 2019 आणि 2023 मधील सर्वात मोठा फरक म्हणजे कर्णधारपद. 2019 मध्ये रोहित शर्मा फक्त एक फलंदाज म्हणून संघाचा भाग होता. तर, विराट कोहली कर्णधारपद सांभाळत होता.
अहमदाबादमध्ये रंगणार विश्वचषकाचा शानदार उद्घाटन सोहळा; 10 संघाच्या कर्णधारांची हजेरी
त्यानंतर आता 2023 च्या विश्वचषकासाठी रोहित शर्मा कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. त्यामुळे त्याला त्याच्या फलंदाजीसह संघातील इतर प्रश्नही सोडवायचे आहेत. ज्या प्रश्नांची उत्तरे सध्या रोहित शर्मा शोधत आहे तशाच काहीशा प्रश्नांची उत्तरे 2019 मध्ये विराट कोहली शोधत होता. त्यामुळेच की काय थ्री इडिएट्समधील ‘ऑल इज वेल’ डायलॉग म्हणत रोहित स्वतःला येणाऱ्या आव्हानांसाठी हिंमत देण्याचा प्रयत्न रोहितकडून केला जात आहे.