Download App

Asian Games 2023 : अदितीने रचला इतिहास! ‘गोल्फ’मध्ये पदक जिंकणारी पहिलीच भारतीय

Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची (Asian Games 2023) चमकदार कामगिरी सुरूच आहे. भारताने आतापर्यंत दमदार कामगिरी करत अनेक पदकांवर नाव कोरलं आहे. आताही अदिती अशोकने अशीच ऐतिहासिक कामगिरी करत यश मिळवले आहे. भारताकडून एशियन गेम्समध्ये गोल्फमध्ये पदक जिंकणारी आदिती ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत 41 पदके जिंकली आहेत. यामध्य 11 सुवर्ण, 16 सिल्व्हर आणि 14 ब्राँझ पदकांचा समावेश आहे. आज 1 ऑक्टोबर रोजी भारताला गोल्फ प्रकारात पहिल्यांदाच मेडल मिळाले. आदिती अशोक हिने दमदार कामगिरी करत देशाला हे पदक मिळवून दिले.

टेनिस-स्क्वॉशमध्ये गोल्ड, हॉकीमध्ये पाकिस्तानचा धुव्वा; आशियाई क्रीडा स्पर्धेत सातवा दिवस भारताचा

या स्पर्धेत गोल्फर अदिती अशोकने रौप्यपदकाची कमाई केली. एक वेळ अशी आली होती की अदिती सुवर्णपदक जिंकण्याच्या परिस्थितीत होती. मात्र, थायलँडच्या युबोल अर्पिचिया हिने शेवटच्या टप्प्यात शानदार कामगिरी केली आणि सुवर्णपदाकाची कमाई केली. दक्षिण कोरियाच्या ह्युनजो यू या खेळाडू्ने ब्राँझ पदक पटकावले. या स्पर्धेत महिला गोल्फ टीम चौथ्या क्रमांकावर राहिली.

भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

दरम्यान, काल भारताने स्पर्धेत दमदार कामगिरी केली. भारतीय हॉकी संघाने पाकिस्तान (India vs Pakistan hockey) विरुद्ध ऐतिहासिक कामगिरी केली. भारताने हा सामना 10-2 अशा फरकाने जिंकला. यामुळे पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठणे कठीण झाले आहे. या सामन्यात भारतीय हॉकी संघाने पूर्वार्धापासून आपली पकड मजबूत करत 2-0 अशी बरोबरी साधली. यानंतर दुसऱ्या हाफच्या शेवटी स्कोअर लाइन 4-0 अशी झाली.

पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत सिंगने भारतासाठी सर्वाधिक 4 गोल केले. वरुणलाही 2 गोल करण्यात यश आले. याशिवाय समशेर, मनदीप, ललित आणि सुमित यांनी प्रत्येकी एक गोल केला. या स्पर्धेत भारताचे खेळाडू दमदार कामगिरी करत आहेत. 8 ऑक्टोबरपर्यंत स्पर्धा सुरू राहणार आहे. त्यामळे या स्पर्धेत भारताला आणखी काही पदके मिळण्याची शक्यता आहे.

Commercial LPG Cylinder : सणासुदीत महागाईचा मोठा झटका! LPG गॅसच्या दरात मोठी वाढ

Tags

follow us