Download App

Asian Games 2023 : भारताचा पराक्रम ! थरारक सामन्यात दक्षिण कोरियाला लोळवलं

Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) आता भारतीय संघांची पावले विजयाकडे पडू लागली आहे. भारताच्या फुटबॉल संघाला सुरुवातीलाच चीनकडून पराभव स्वीकारावा लागला असला तरी आता भारताच्या व्हॉलीबॉल संघाने विजयी वाटचाल सुरू केली आहे. भारताच्या पुरुष व्हॉलीबॉल संघाने बुधवारी इतिहास रचला. रौप्यपदक विजेत्या दक्षिण कोरिया (South Korea) संघाला पराभवाची धूळ चारली. दोन तास 38 मिनिटे चाललेल्या या रोमहर्षक सामन्यात भारतीय संघ 0-2 असा पिछाडीवर होता. नंतर मात्र जोरदार कमबॅक करत 3-2 अशा फरकाने विजयाला गवसणी घातली.

Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत चीनकडून भारत पराभूत

दक्षिण कोरियाचा व्हॉलीबॉल संघ बलाढ्य असाच आहे. या संघाने आतापर्यंत तीन वेळेस सुवर्णपदक पटकावले आहे. त्यामुळे या संघासमोर भारताचा संघ किती काळ टिकाव धरू शकेल असा प्रश्न सगळ्यांनाच होता. सुरुवातीच्या काही वेळात दक्षिण कोरियाचा चमकदार खेळ पाहून भारत सामना जिंकणार नाहीच अशीच बहुतेकांची धारणा झाली होती. मात्र भारताने अनेकांचा हा समज खोटा ठरवला. भारताने त्याच्या गटात 2 पैकी 2 सामने जिंकत अव्वल स्थान पटकावले. या यशानंतर संघ पुढील फेरीसाठीही पात्र ठरला आहे.

जागतिक क्रमवारीचा विचार केला तर दक्षिण कोरियाचा संघ 23 व्या क्रमांकावर आहे. मागील दहा वर्षांतील भारतीय संघाचा दक्षिण कोरियावरील हा पहिलाच विजय आहे. भारतीय संघाने 1986 नंतर या स्पर्धेत पदक जिंकलेले नाही. याआधी 1986 मध्ये भारताने कांस्यपदक जिंकले होते. त्यामुळे या स्पर्धेत भारताच्या विविध खेळाच्या संघांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या स्पर्धेत येथून पुढे हे संघ कशी कामगिरी करतात हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

IND vs AUS : मोहालीत ऑस्ट्रेलियाची बादशाहात, टीम इंडियाच्या नावावर आहे नकोसा रेकॉर्ड

या सामन्यात अश्वल राय याने उत्कृष्ट कामगिरी केली. सामन्यानंतर तो म्हणाला, सामना कधी आमच्याकडे तर कधी कोरियाच्या संघाकडे फिरत होता. आम्ही हँग आऊट करून खेळाच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला. आमचा हा निर्णय योग्यच ठरला. यानंतर आम्ही सामना जिंकला. आता पुढील 12 व्या फेरीत आधिक चांगली कामगिरी करायची आहे.

Tags

follow us