Download App

Asian Games 2023 : अटीतटीच्या सामन्यात महिला कबड्डी संघाची तैवानवर मात; गोल्ड मेडल जिंकलं

Asian Games 2023 : चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी (Asian Games 2023) चमकदार कामगिरी करत पदकांची लयलूट सुरुच ठेवली आहे. आजही भारतीय महिला कबड्डी संघाने ऐतिहासिक कामगिरी करत भारताला गोल्ड मेडल मिळवून दिले. या यशानंतर भारताला मिळालेल्या एकूण पदकांची संख्या 100 आणि त्यातील सुवर्णपदकांची संख्या 25 झाली आहे. या सामन्यात भारतीय महिला कबड्डीपटूंनी जबरदस्त कामगिरी करत तैवानचा पाडाव केला. तैवानला 26-25 अशा फरकाने हरवलं. हा सामना जिंकत भारताने सुवर्णपदकावरही नाव कोरलं

World Cup 2023 : पाकिस्तानने पहिला सामना जिंकला… पण नेदरलँड्सचा एकटा पठ्ठ्या नडला !

या सामन्यात हाफ टाईपर्यंत भारताचा संघ 14-9 अशा फरकाने आघाडीवर होता. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये मात्र तैवानच्या महिलांनी जोरदार टक्कर देत सामन्यात वापसी केली. मात्र त्यांना सामना जिंकता आला नाही. या विजयानंतर आता भारताच्या खात्यातील पदकांची संख्या 100 झाली आहे. यामध्ये 25 सुवर्णपदकांचाही समावेश आहे. तसेच 35 सिल्व्हर आणि 40 ब्राँझ मेडलचा समावेश आहे. भारताने आतापर्यंत नऊ क्रीडा प्रकारात कमीत कमी 1 सुवर्णपदक जिंकले आहे. यानंतर आज दुपारी पुरुष कबड्डी टीम आणि पुरुष क्रिकेट टीमचे सामने होणार आहे. या सामन्यातही भारताला पदके मिळण्याची शक्यता आहे.

हॉकी संघाचा जपानवर ऐतिहासिक विजय

हॉकीमध्ये 2018 च्या सुवर्णपदक विजेत्या जपानचा 5-1 ने पराभव करत भारताने तब्बल नऊ वर्षांनंतर हॉकीमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. 2014 च्या इंचॉन आशियाई स्पर्धेत भारताने शेवटच्या वेळी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. सुवर्णपदाकासह भारतीय हॉकी संघाने 2024 मध्ये पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमधील तिकीटही पक्के केले आहे.

2023 आणि 2014 पूर्वी भारतीय पुरुष हॉकी संघाने 1966 आणि 1998 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. चार सुवर्णांव्यतिरिक्त टीम इंडियाने 1958, 1962, 1970, 1974, 1978, 1982, 1990, 1994, 2002 आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते, तर 1986, 2010 आणि 2018 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते.

Asian Games 2023 : बांग्लादेशचा पराभव! टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

2023 च्या आशियाई खेळांमध्ये भारताचा प्रवास

सध्या सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत भारतीय संघा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. संघाने ग्रुप स्टेजमधील पाचही सामने जिंकले. तसेच ग्रुप फेरीत 58 गोल केले होते. भारताने अंतिम फेरीत पाच गोल केले तर, जपानच्या संघाला केवळ एक गोल करता आला. म्हणजेच संपूर्ण स्पर्धेत भारताने 68 गोल केले.

Tags

follow us