Download App

Asian Hockey Cup 2025 : भारतीय नारी थायलंडपे भारी! आशियाई करंडकात दणक्यात विजय

भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई हॉकी करंडक स्पर्धेला दमदार सुरुवात केली. पहिल्या सामन्यात भारताने थायलंडचा 11-0 अशा फरकाने धुव्वा उडवत अव्वल स्थान पटकावले.

  • Written By: Last Updated:

Indian Women’s Hockey Team defeated Thailand : भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई हॉकी करंडक स्पर्धेला दमदार सुरुवात केली आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने थायलंडचा 11-0 अशा फरकाने धुव्वा उडवत अव्वल स्थान पटकावले. भारताकडून तब्बल आठ खेळाडूंनी गोल नोंदवले, ज्यातून संघाच्या एकसंध कामगिरीचे दर्शन घडले.

आशियाई हॉकी करंडक

उदिता डुहान आणि ब्युटी डुंग डुंग (Thailand) यांनी प्रत्येकी दोन गोल करत चमक दाखवली. त्याशिवाय मुमताज खान (7वे मिनिट), ( Indian Women’s Hockey Team) संगीत कुमारी (10वे मिनिट), नवनीत कौर (16वे मिनिट), लालरेमसियामी (18वे मिनिट), सुमन देवी (49वे मिनिट), शर्मिला देवी (57वे मिनिट) आणि ऋतुजा पिसाळ (60वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल करून भारताच्या (Asian Hockey Cup 2025) विजयात मोलाची भर घातली.

गणेश विसर्जन 2025 : आनंद, भक्ती आणि भावनांच्या लाटेत लाडक्या बाप्पाला आज निरोप

दमदार आक्रमण आणि पेनल्टी कॉर्नरचा फायदा

सामन्याच्या सुरुवातीला मुमताज खान व संगीत कुमारी यांनी आकर्षक फिल्ड गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर नवनीत कौर व लालरेमसियामी यांनी दोन (Asian Hockey Federation) मिनिटांच्या आत दोन जलद गोल करीत थायलंडवर दबाव आणला. उदिताने पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवत भारताला हाफटाईमला 5-0 अशी मजबूत आघाडी मिळवून दिली.

बीडमध्ये खून मालिका सुरूच; मेंढपाळ तरुणाची निर्घृण हत्या, काय आहे नक्की प्रकरण?

थायलंडच्या बचावफळीवर सतत दबाव टाकत भारताला एकूण नऊ पेनल्टी कॉर्नर मिळाले, त्यापैकी पाचवर गोल करण्यात यश आले. तिसऱ्या सत्रात ब्युटी डुंग डुंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला, तर शेवटच्या सत्रात भारतीय संघाने आक्रमक खेळ करत आणखी पाच गोल जोडले.

पुढील आव्हान जपानचे

भारतीय संघाचा पुढील सामना 6 सप्टेंबर रोजी जपानविरुद्ध होणार आहे. जपानने देखील पहिल्या लढतीत सिंगापूरवर 9-0 अशी एकतर्फी मात केली आहे. त्यामुळे भारत-जपान सामना रोमांचक ठरण्याची शक्यता आहे. सर्वांचे लक्ष या लढतीकडे लागले आहे.

follow us