Download App

रोमांचक सामन्यात बांगलादेशने उभारला धावांचा डोंगर, नजमुल आणि मेहंदीने झळकावली शतके

AFG Vs BAN: आशिया कपमध्ये (Asia Cup 2023) सध्या रोमांचक सामने सुरू आहेत. आज ब गटातील महत्त्वाच्या सामन्यात बांगलादेशचा सामना अफगाणिस्तानशी (AFG Vs BAN) होत आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात बांगलादेशने अफगाणिस्तानला विजयासाठी 335 धावांचे लक्ष्य दिले आहे. बांगलादेशकडून सलामीवीर मेहदी हसन मिराज (112) (Mehdi Hasan Miraj) आणि नजमुल हुसेन शांतो (104) (Najmul Hussain Shanto) यांनी शतके झळकावली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर बांगलादेशने चांगली सुरुवात केली. सलामीवीर मोहम्मद नईम आणि मेहदी हसन मिराज यांनी 60 धावांची भागीदारी केली. पॉवरप्लेच्या शेवटच्या चेंडूवर नईमला बाद करून मुजीब उर रहमानने अफगाणिस्तानला पहिले यश मिळवून दिले. नईमने पाच चौकारांच्या मदतीने 28 धावा केल्या. यानंतर तौफिक हृदोयला गुलबदिन नायबने शून्यावर बाद केले.

मार मुसंडी! महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार धाराशिवमध्ये रंगणार, तारखा जाहीर…

मिराज आणि नजमुलने झंझावाती शतके झळकावली
दोन गडी बाद झाल्यानंतर मेहदी हसन मिराज आणि नजमुल हुसेन शांतो यांनी शानदार फलंदाजी करत अफगाण गोलंदाजांची अवस्था दयनीय केली. मेहदी मिराजने रिटायर हर्ट होण्यापूर्वी 119 चेंडूत 112 धावा केल्या, ज्यात सात चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. तर नजमुल हुसेनने 105 चेंडूत 104 धावा केल्या. नजमुल हुसेनने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 2 षटकार मारले.

Monalisa : भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचं नवं फोटोशूट, एकाहून एक किलर पोज

कर्णधार शकीब अल हसन आणि मुशफिकुर रहीम यांनीही बांगलादेशसाठी उपयुक्त खेळी खेळली. शाकिबने 18 चेंडूंचा सामना करत नाबाद 32 धावा केल्या, ज्यात चार चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. रहीमने 15 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 25 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून गुलबदिन नायब आणि मुजीबने प्रत्येकी एक विकेट घेतली.

Tags

follow us