India Women vs Bangladesh Women: भारतीय महिला क्रिकेट टीमने T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात बांगलादेशचा 8 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. कमी धावसंख्येच्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. टीम इंडियाकडून दीप्ती शर्माने 3 आणि मिन्नू मणीने 2 विकेट घेतल्या. शेफाली वर्माने शानदार गोलंदाजी करताना 3 बळी घेतले. टीम इंडियाने 96 रन्सचं टार्गेट दिलं होतं. भारताने पहिला सामना 7 विकेटने जिंकला होता.
बांगलादेशकडून शमीमा सुलताना आणि राणी सलामीला आल्या. सुलताना 5 धावा करून बाद झाली. तिने 4 चेंडूंचा सामना करताना एक चौकार मारला. राणीने 6 चेंडूंचा सामना करत 5 धावा केल्या. तिने चौकारही मारला. मुर्शिदा खातूनने 15 चेंडूंचा सामना करत 4 धावा केल्या. रितू मोनीने 6 चेंडूंचा सामना करत 4 धावा केल्या. शोर्ना अख्तरने 17 चेंडूत 7 धावा केल्या. कर्णधार निगार सुलतानाने 38 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने 55 चेंडूंचा सामना करताना 2 चौकार मारले. दीप्ती शर्माने तिला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. फहिमा खातून आणि मारुफा अख्तर खाते न उघडताच बाद झाल्या.
HP Rain: मनालीच्या पुरात अभिनेता अडकला; व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “घरी परतण्याचा…”
भारताकडून दीप्ती शर्मा आणि शेफाली वर्मा यांनी शानदार गोलंदाजी केली. दीप्तीने 4 षटकात केवळ 12 धावा देत 3 बळी घेतले. शेफालीने 3 षटकात 15 धावा देत 3 बळी घेतले. मिन्नू मणीने 4 षटकात 9 धावा देत 2 बळी घेतले. तिने एक मेडन ओव्हर टाकली. अनुषाने 4 षटकात 20 धावा देत एक विकेट घेतली. पूजा वस्त्राकरने एका षटकात 10 धावा दिल्या. तिला एकही विकेट मिळाली नाही.
Mrunal Thakur; किलर पोजमध्ये मृणाल ठाकूर, पहा क्लासी लूक
प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 8 गडी गमावून 95 धावा केल्या होत्या. टीम इंडियासाठी सलामीवीर शेफाली वर्माने सर्वाधिक 19 धावा केल्या. तिने 14 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार मारले. यास्तिका भाटियाने 13 चेंडूत 11 धावा केल्या. स्मृती मानधनाने 13 धावांचे योगदान दिले. मंधानाने 13 चेंडूंचा सामना करत 2 चौकार लगावले. अमनजोत कौरने 14 धावांचे योगदान दिले. मिन्नू मणीने नाबाद 5 आणि पूजा वस्त्राकरने नाबाद 7 धावा केल्या.