HP Rain: मनालीच्या पुरात अभिनेता अडकला; व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “घरी परतण्याचा…”

HP Rain: मनालीच्या पुरात अभिनेता अडकला; व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “घरी परतण्याचा…”

Himachal Pradesh Rain: उत्तर भारतात जोरदार पाऊस सुरु आहे. अनेक राज्यात पावसाने हाहाकार माजवला असल्याने नद्यांना पूर आले आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) पावसामुळे काही ठिकाणी दरड कोसळल्याच्या धक्कादायक घटना देखील समोर येत आहेत. (Manali Flood)  घरं वाहून गेल्याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर (Social media) धुमाकूळ घालत आहे. या अशा मुसळधार पावसामध्ये (heavy rain) एक अभिनेता मनालीमध्ये अडकला आहे. त्याने सोशल मीडियावर याविषयी माहिती दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ETimes TV (@etimes_tv)


अभिनेता रुस्लान मुमताज (Ruslan Mumtaz) सध्या मनालीत एका प्रोजेक्टसाठी शूटिंग करत असल्याची माहिती मिळाली आहे. तिथे तो मुसळधार पाऊस आणि पुरामध्ये अडकला असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. रुस्लानने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीत शहरात नेमकी काय स्थिती आहे, आणि तो जिथे अडकला आहे. त्या ठिकाणच्या परिस्थितीविषयी सांगत असल्याचे दिसून येत आहे.

Manali Flood

Manali Flood

तसेच जोरदार पडत असलेल्या पावसामुळे मनाली आणि चंदीगडला जोडणारा रस्ता हा पुराखाली गेल्याचे देखील त्याने व्हिडिओमधून सांगत आहे. पहिला फोटो पोस्ट करत रुस्लानने सांगितले आहे की, माझ्या पाठीमागे असलेला रस्ता आता दिसत नाही. पुढच्या पोस्टमध्ये त्याने रस्ता कसा बुडाला ते विडिओ शेअर केलं आणि सांगितले आहे की, हा रस्ता आता अस्तित्वात नाही. रुस्लानने पूरग्रस्त ठिकाणाचे काही व्हिडीओ शेअर करत आहे.

यामध्ये तो जिथे थांबला होता. तेथील सध्याची परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी यावेळी केला आहे. या व्हिडीओमध्ये रुस्लान गॅरेजसारख्या जागेत तो आश्रय घेतला आहे. तसेच तो इतर सहकाऱ्यांसोबत जेवत असल्याचे देखील दिसून आला आहे. हेच ‘रात्रीसाठी घर’ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच त्याने मनाली चंदीगडला जोडणारा रस्ता पुरामुळे वाहून गेल्याचे सांगितल आहे. मी मनालीत नेटवर्क नसल्याने अडकून पडलो आहे.

आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?

रस्ते बंद असल्याने घरी परतण्याचा कोणताही चान्स नाही आणि मी शूटिंग करू शकत नाही, अशा परिस्थिती माझ्यावर कधी येईल अशी मी कल्पना देखील केली नव्हती.  अतिशय सुंदर ठिकाणी इतकी वाईट परिस्थिती उद्भवली आहे. मी आनंदी व्हावं, दुःखी व्हावं, आभार मानावे, कृतज्ञता व्यक्त करावी की फक्त सफरचंदाचा आनंद घ्यावा, हेही मला कळत नाही, अशा गोष्टींमध्ये अभिनेता चांगलाच अडकल्याचे दिसून येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube