Stop Clock Rule: एकदिवसीय आणि T20 फॉरमॅटमध्ये वेळेची बचत करण्यासाठी आयसीसी (ICC) नवीन नियम लागू करणार आहे. या नियमांनुसार आता एक षटक संपल्यानंतर गोलंदाजी करणाऱ्या संघाला पुढील षटक सुरू करण्यासाठी 60 सेकंदांचा (Stop Clock Rule) अवधी दिला जाईल. या निर्धारित वेळेत गोलंदाजाला त्याचे षटक सुरू करता आले नाही आणि डावात असे तीन वेळा झाले तर फलंदाजी करणाऱ्या संघाला 5 धावा मोफत मिळतील.
गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या अडचणी वाढतील
डिसेंबर 2023 ते एप्रिल 2024 या कालावधीत ICC हा नवीन नियम चाचणीच्या आधारावर वापरेल. एक ओव्हर पूर्ण झाल्यानंतर 60 सेकंद पूर्ण झाल्याची खूण करण्यासाठी ‘स्टॉप क्लॉक’ वापरला जाईल. जर एखादा संघ डावाच्या दरम्यान पुढील षटक 60 सेकंदात तीन वेळा सुरू करू शकला नाही, तर फलंदाजी करणाऱ्या संघाला त्याचा फायदा होईल आणि त्यांना दंड म्हणून 5 धावा मोफत दिल्या जातील. जर हा नियम चाचण्यांदरम्यान यशस्वी झाला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अंमलबजावणी करू शकते.
गांगुली खेळणार राजकीय इनिंग? ममता दीदींनी दिली मोठी जबाबदारी
‘टाइम आऊट’शी संबंधित नियम
आयसीसीचा हा नवा नियम ‘टाइम आऊट’शी तंतोतंत जुळतो. टाइम आऊटमध्ये जर फलंदाज क्रीझवर पोहोचल्यानंतर दोन मिनिटे चेंडू खेळण्यास तयार नसेल तर त्याला बाद घोषित केले जाते. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत अँजेलो मॅथ्यूज देखील त्याचा बळी ठरला आणि शकीब अल हसनच्या अपिलानंतर त्याला पंचांनी बाद घोषित केले.
श्रीलंकेकडून आयसीसीने हिसकावले विश्वचषकाचे यजमानपद, आता कुठे होणार स्पर्धा?
फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होईल
आयसीसीच्या नवीन नियमांमुळे फलंदाजी करणाऱ्या संघाला मोठा फायदा होणार आहे. जर संघ निर्धारित वेळेत षटक पूर्ण करू शकला नाही, तर त्याला 30 यार्डच्या सर्कलमध्ये अतिरिक्त क्षेत्ररक्षक ठेवावा लागतो. मात्र, नवीन नियम आल्यामुळे गोलंदाजी संघाला वेळेची अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. डावाच्या मध्यभागी दोनदा 60 सेकंदात षटक सुरू न केल्याबद्दल गोलंदाजी संघावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, परंतु ही चूक तिसऱ्यांदा झाल्यास फलंदाजी करणाऱ्या संघाला 5 धावा मिळतील.