Team India in Barbados : भारतीय क्रिकेट संघाने टी 20 विश्वचषकाच्या (Team India) फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा (IND vs SA) पराभव करत विश्वकप जिंकला. यानंतर टीम इंडियाला (Team India) माघारी परतायचे होते. परंतु, बेरिल नावाच्या चक्रीवादळाने भारतीय संघाच्या प्रवासात आडकाठी आणली. खेळाडू बार्बाडोसमध्येच (Barbados) अडकून पडले. भारतीय संघ मायदेशात केव्हा परतणार अशा चर्चा सुरू असतानाच आता एक गुडन्यूज आली आहे.
या वादळामुळे खेळाडूंना बार्बाडोसमधून नियोजित वेळेत निघता आले नाही. आता बीसीसीआयने खास (BCCI) व्यवस्था केली आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार भारतीय खेळाडू बार्बाडोसमधील स्थानिक वेळेनुसार आज संध्याकाळी सहा वाजता विशेष विमानाने भारताकडे रवाना होतील. उद्या संध्याकाळी साडेसात वाजता खेळाडू दिल्लीत (New Delhi) पोहोचतील.
रोहित-विराट पाठोपाठ रवींद्र जडेजाचाही मोठी घोषणा; T20 International cricketमधून निवृत्ती
याआधी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी (Jay Shah) सांगितले होते की टीम इंडियाला घेऊनच भारतात परतु. आता सर्व व्यवस्था झाल्यानंतर संघातील खेळाडू मायदेशात परतण्यासाठी तयार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार संपूर्ण बार्बाडोसला चक्रीवादळाचा तडाखा बसला. या वादळामुळे भारतीय संघातील खेळाडू त्यांच्या हॉटेलमधील रुममध्येच अडकून पडले होते. वादळामुळे वीज आणि पाण्याची व्यवस्थाही ठप्प झाली आहे. वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे अनेक उड्डाणेही रद्द करण्यात आली आहेत.
टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरल्यानंतर टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू हे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ( T20 International cricket) निवृत्ती जाहीर करत आहेत. विश्वचषक जिंकल्यानंतर लगेच माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) व कर्णधार रोहित शर्माने निवृत्तीची घोषणा केलीय. आता अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यानेही टी-20 आंतराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे.
IND vs SA Test : पराभवानंतर टीम इंडियाला मोठा झटका; ‘या’ कारणामुळे ICC ने केली कारवाई
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेला सामना जिंकण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 16 धावा हव्या होत्या. अर्शदीप सिंह (Arshadeep Singh) आणि जसप्रित बुमराहच्या चार-चार ओव्हर टाकून झाल्या होत्या. त्यामुळे शेवटची ओव्हर हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) देण्यात आली. या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकने डेव्हिड मिलरला तंबूत धाडलं. यानंतरही हार्दिक पांड्याने (T20 World Cup 2024) चिवट गोलंदाजी करत फक्त 8 धावा दिल्या आणि टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.