BCCI : बीसीसीआय म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI ) भारतीय पुरुष वरिष्ठ संघाच्या निवड समितीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या अधिकृत वेबसाईटवरून ही माहिती देण्यात आली की, भारतीय पुरुष वरिष्ठ संघाच्या निवड समितीतील एका जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना आमदार लंकेंकडून मोठं गिफ्ट! साडेसोळा कोटींचे अनुदान मंजूर
दरम्यान सध्या भारतीय पुरुष वरिष्ठ संघाचे निवड समितीचे नेतृत्व अजित आगरकर हे करत आहेत. मात्र त्यांच्यामुळेच आता सलील अंकोला यांनाही जागा सोडावी लागणार असल्याचे बोलले जात आहे. कारण सलील अंकोला हे वेस्ट झोनचे प्रतिनिधित्व करतात. तर आगरकर हे देखील याच विभागाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे अंकोला यांनाही जागा नॉर्थ झोनसाठी सोडावी लागणार आहे.
Video : बोला जय श्रीराम ! ‘खास रे’चे खास उत्सवगीत बघाच…
तर बीसीसीआयकडून 25 जानेवारी या जागेसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. त्यानंतर बीसीसी अर्ज केलेल्या उमेदवारांची नावे शॉर्टलिस्ट करणे आणि प्रत्येक उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. तर या पदासाठी अर्ज करणारा अर्जदार हा क्रिकेटमधून पाच वर्षांपूर्वी निवृत्त झाला असला पाहिजे. तसेच गेल्या पाच वर्षांपासून तो कोणत्याही क्रिकेट समितीवर काम करत नसावा. अशाच व्यक्तीला या पदासाठी अर्ज करता येतो. त्याचबरोबर या उमेदवाराने किमान सात कसोटी किंवा तीस प्रथम श्रेणी क्रिकेट सामने किंवा दहा वनडे आणि वीस प्रथम श्रेणी सामने खेळलेले असावे ही अट आहे.
सध्याच्या निवड समितीमध्ये अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसुंदर दास, सुब्रोतो बॅनर्जी, सलील अंकोला, श्रीधरण शरथ यांचा समावेश आहे त्यामधील आता सलील अंकोला यांच्या जागी नवीन सदस्य नियुक्त करण्यात येणार आहे.