BCCI New Rules for Champions Trophy 2025 : आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा लवकरच सुरू होणार आहेत. भारतासाठी ही स्पर्धा अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे खेळाडूंनी चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे. याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाची (Team India) कामगिरी अतिशय रटाळ राहिली होती. विराट कोहली, रोहित शर्मा पुरते अपयशी ठरले होते. आता चॅम्पियन्स ट्रॉफीत (Champions Trophy 2025) असे घडू नये याची काळजी बीसीसीआयकडून घेतली (BCCI) जात आहे. बीसीसीआयने खेळाडूंसाठी काही कठोर नियम तयार केले आहेत. या गाइडलाइन्स काय आहेत याची यादीच खेळाडूंना देण्यात आल्याची माहिती आहे. या नियमांमुळे खेळाडू नाराज होण्याचीच शक्यता जास्त आहे.
टीम इंडियाला धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफीतून जसप्रित बुमराह आऊट; ‘या’ खेळाडूला लॉटरी..
क्रिकबजमधील एका रिपोर्टनुसार बीसीसीआयने प्रवासापासून ते कुटुंबियांना सोबत घेऊन जाण्यापर्यंत अनेक नियम तयार केले आहेत. इंग्लंड विरुद्ध झालेल्या मालिके दरम्यान बीसीसीआयने स्पष्ट केले होते की या नियमांच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार आहे. या नियमांच्या बाबतीत बीसीसीआय ताठर दिसत आहे. त्यामुळे नाराजी असली तरी खेळाडूंना या नियमांचे पालन करावेच लागणार आहे.
नवीन नियम तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत. 19 फेब्रुवारी ते 9 मार्चपर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू राहणार आहे. यासाठी हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे सचिव आर. देवराज भारतीय संघाचे व्यवस्थापक आहेत. कोणत्याही परिस्थितीत नियमांचे पालन झालेच पाहिजे असा आदेश देवराज यांना मिळाला आहे. क्रिकबजच्या हवाल्याने बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की नियमांच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. बीसीसीआयचे धोरण या नियमांच्या बाबतीत अतिशय गंभीर आहे याची जाणीव खेळाडूंना करून देण्यात आली आहे.
कोणताही खेळाडू आपल्यासोबत पर्सनल स्टाफ घेऊन जाणार नाही. या नियमाचे पालन करावेच लागणार आहे. त्यामुळे खेळाडूला आता आचारी, नॅनी, हेयर स्टायलिस्ट तसेच कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊन जाण्याबाबत मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. 45 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळासाठी संघ परदेश दौऱ्यावर जाणार असेल तर अशा परिस्थितीत खेळाडू फक्त एकदाच परिवारासोबत वेळ व्यतित करू शकतात. चॅम्पियन्स ट्रॉफी चार आठवडे चालणार आहे. त्यामुळे खेळाडूंना या काळात कुटुंबाची भेट घेता येणार नाही.
टीम इंडियाने खरंच चीटिंग केली? हर्षितच्या Concussion सब्सटीट्यूटचा वाद चिघळला; काय आहे नियम..