Jay Shah ICC New Chairman : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, BCCI सचिव जय शाह (Jay Shah) यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) नवीन अध्यक्ष बनले आहे. जय शाह ग्रेग बार्कले (Greg Barclay) यांची जागा घेणार आहे.
माहितीनुसार, जय शाह 1 डिसेंबर 2024 रोजी पदभार स्वीकारणार आहे. आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपणार आहे.
BCCI Secretary Jay Shah has been elected unopposed as the next Independent Chair of the International Cricket Council (ICC). He will assume this role on December 1, 2024: ICC pic.twitter.com/W3ca8MMAYw
— ANI (@ANI) August 27, 2024
BCCI सचिव जय शाह यांची या पदासाठी बिनविरोध निवड झाली आहे. जय शाह क्रिकेट इतिहासात ICC चे सर्वात तरुण अध्यक्ष बनले आहे. ICC चे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी तिसरी टर्म घेण्यास नकार दिल्याने या पदावर जय शाह यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
विधानसभेपूर्वी शिंदे सरकारचा मास्टरस्टोक, आशा स्वयंसेविकांसाठी मोठी घोषणा, मिळणार 10 लाख रुपये
जय शाह ICC चे अध्यक्ष बनणारे पाचवे भारतीय आहे. यापूर्वी जगमोहन दालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर हे आयसीसीचे अध्यक्ष राहिले आहेत. जय शाह यांची ICC च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने BCCI सचिव कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.