Asian Cricket Council : आशियाई क्रिकेट परिषदेच्या (Asian Cricket Council) वार्षिक बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jai Shah) आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून कायम राहतील. जय शाह यांची सलग तिसऱ्यांदा आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. आशियाई क्रिकेट परिषदेच्या वार्षिक बैठकीत याची घोषणा करण्यात आली आहे.
श्रीलंका क्रिकेटचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी ठेवला प्रस्ताव
श्रीलंका क्रिकेट (SLC) चे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी जय शाह यांचा कार्यकाळ वाढवण्याचा प्रस्ताव दिला. याआधीही शम्मी सिल्वा यांनी जय शाहचे नाव पुढे केले होते. यानंतर इतर सर्व सदस्यांनी एकमताने जय शहा यांच्या नावाला मंजुरी दिली. जय शाह यांनी जानेवारी 2021 मध्ये प्रथमच आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले होते. यापूर्वी बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत होते.
Shilpa Shetty: ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज अवॉर्ड’ने अभिनेत्री शिल्पा शेट्टीला सन्मानित
Jay Shah’s term as the president of the Asian Cricket Council (ACC) unanimously extended by one year at its Annual General Meeting.
(File photo) pic.twitter.com/jaip3Bsyzt
— ANI (@ANI) January 31, 2024
आशियाई क्रिकेट परिषदेची वार्षिक बैठक बाली, इंडोनेशिया येथे सुरू आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे सर्व सदस्य या बैठकीत सहभागी होत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या अध्यक्षाव्यतिरिक्त या बैठकीत मीडिया अधिकारांवर चर्चा सुरू आहे.त्याचवेळी, याआधी आशिया चषकाबाबत आशियाई क्रिकेट परिषदेच्या वार्षिक बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. आशिया चषक 2025 वनडे ऐवजी टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवला जाईल. या आधीचा आशिया चषक 2024 एकदिवसीय स्वरूपात खेळला गेला होता. याचे यजमानपद श्रीलंकेने दिले होते. त्याच वेळी, असे मानले जाते की आशिया कप 2025 ओमान आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवला जाऊ शकतो.
Sunny Leone: काळ्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये सनी, बोल्ड आणि हॉट अदांवर चाहते फिदा