sunil gavaskar upset that he was not called to hand over Border Gavaskar trophy : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) भारताने गमविली आहे. पाच सामन्याची कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने (AUS) 3-1 ने जिंकली आहे. त्याचबरोबर तब्बल दहा वर्षानंतर ऑस्ट्रेलियाने ही ट्रॉफी जिंकली आहे. या मालिकेत भारतीय संघाची सुमार कामगिरी झाल्याने भारतीय क्रिकेटरसिकांचा हिरमोड झाला आहे. त्यात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारतीय क्रिकेटरसिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. विजयी ऑस्ट्रेलियाला संघाला ही ट्रॉफी देण्यासाठी केवळ माजी क्रिकेटपटू अॅलन बॉर्डर (Allan Border) यांनाच बोलविले. परंतु तेथे काही अंतरावर असलेले समालोचक सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांना बोलविले आहे. दोघांच्या नावाने ही ट्रॉफी असताना गावस्कर यांना न बोलविल्याने त्यांचा अपमान झाला आहे. त्यावरून आता क्रिकेट ऑस्ट्रेलियावर टीका होऊ लागली आहे.
सुजयच्या वक्तव्याने साई भक्तांच्या भावना दुखावल्या, पण त्यांचा हेतू…; राधाकृष्ण विखे काय म्हणाले?
यापूर्वी ऑस्ट्रेलियाने 2014-15 मध्ये ही मालिका जिंकली होती. त्यानंतर भारतीय संघाकडेच ही ट्रॉफी होती. गावस्करांबाबत असे पहिल्यांदा झालेले नाही. 2018-19 मध्ये अॅलन बोर्ड यांच्या हस्ते भारतीय संघाला ट्रॉफी देण्यात आली आहे. 2020-21 मध्ये कोरोना काळात ही ट्रॉफी अंजिक्य रहाणे यांनी स्वतः उचलली होती. तर 2022-2023 मध्ये सुनील गावस्कर यांनी रोहित शर्माला ही ट्रॉफी दिली होती.
‘…तर ते इतके दिवस गप्प का?’, रुपाली चाकणकरांचा सुरेश धसांवर निशाणा
ट्रॉफी प्रदान करण्यास न बोलविल्याबद्दल गावस्कर यांनी नाराजी व्यक्त केली. ते एका चॅनेलला प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, पुरस्कार सोहळ्याला मी गेलो असतो, तर मला आनंद झाला असता. दोन्ही देशांसाठी ही ट्रॉफी महत्त्वाची आहे. मी मैदानावरच होतो. ऑस्ट्रेलियाने ही ट्रॉफी जिंकली असली तर त्याचा मला फरक पडत नाही. ते चांगले क्रिकेट खेळले आणि जिंकले आहेत. पण भारतीय असल्याने मला बोलविण्यात आले आहे. मित्र अॅलन बोर्डरबरोबर मी पण ट्रॉफी प्रदान करण्यासाठी गेले असतो. तर मला आनंद झाला असता, असे गावस्कर यांनी म्हटले आहे. त्यांच्या प्रतिक्रियावरून ते नाराज असल्याचे स्पष्ट दिसत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 1996-1997 पासून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळविली जात आहे. चारवेळा भारताने ही ट्रॉफी जिंकली आहे.
असे का झाले ?
क्रिकेट ऑस्ट्रेलियाची ट्रॉफी वितरणाबाबत एक योजना असल्याचे बोलले जात आहे. जर ऑस्ट्रेलियाने ट्रॉफी जिंकली तर एलन बॉर्डर ट्रॉफी देतील आणि भारताने ही ट्रॉफी त्यांच्याकडे कायम ठेवली तर सुनील गावस्कर ट्रॉफी देतील, अशी योजना होती. गावसकर स्टेजवर न जाण्यामागे हेच कारण होते. यामुळे ते नाराज आहेत.