पाच दिवसात ‘तब्बल’ इतक्या चाहत्यांनी लावली हजेरी; भारत-ऑस्ट्रेलिया मेलबर्नमध्ये लोटला जनसागर
IND vs AUS MCG Stadium : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जात असलेला अतिशय रोमांचकारी स्थितीत पोहोचला आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी (IND) खेळाडूंनी नव्हे तर स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांनीच सर्वांचे लक्ष वेधलं आहे. या सामन्याला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावत ८७ वर्षांपूर्वीचा जुना विक्रम मोडला आहे.
IND vs AUS: रोहित शर्मा घेणार निवृत्ती? मुख्य निवडकर्ता अजित आगरकर मेलबर्नमध्ये दाखल
बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात यजमानांनी पाचव्या दिवशी भारतीय संघाला विजयासाठी ३४० धावांचे लक्ष्य दिले आहे. बॉक्सिंग डे कसोटी सामना पाहण्यासाठी ऑस्ट्रेलियातील चाहत्यांनी एमसीजी स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. ज्यामुळे चाहत्यांच्या उपस्थितीचा नवा विक्रम नोंदवला गेला आहे. यावेळी हा सामना पाहण्यासाठी एकूण पाच दिवसांच्या खेळासह एकूण प्रेक्षक संख्या ३,५०,७०० पेक्षा जास्त राहिला. आतापर्यंत या मैदानावर इतके प्रेक्षक कधीच आले नव्हते जेवढे हा सामना पाहण्यासाठी आले आहेत.
याआधी १९३७ मध्ये या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात एकूण ३,५०,५३४ प्रेक्षक पाच दिवसांत आले होते. ऑस्ट्रेलियातही आतापर्यंत कोणताही कसोटी सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांची ही सर्वाधिक संख्या आहे. हा सामना पाहण्यासाठी पाचही दिवस आलेल्या चाहत्यांची संख्या पाहिली तर पहिल्या दिवशी ८७,२४२ चाहते, दुसऱ्या दिवशी ८५,१४७ चाहते, तिसऱ्या दिवशी ८३,०७३ आणि चौथ्या दिवशी ४३,८६७ चाहते आले. सामन्या पाचव्या दिवशी हा सामना पाहण्यासाठी सुमारे ६६,००० चाहत्यांनी हजेरी लावली.
चाहत्यांची नेहमीच असते गर्दी
जगातील कोणत्याही मैदानावर भारतीय संघ सामना खेळतो, तेव्हा स्टेडियममध्ये चाहते मोठ्या संख्येने दिसतात. असेच काहीसे यापूर्वी मसीजी ग्राउंडवर देखील पाहायला मिळाले होते, जेव्हा २०२२ साली येथे झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तान विरुद्ध सामना खेळला गेला होता. या सामन्याला एकूण ९०,२९३ चाहते स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आले होते. याशिवाय याच स्पर्धेत झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात ८२,५०७ चाहते सामना पाहण्यासाठी एमसीजी मैदानावर आले होते.
🚨 ALL-TIME MCG TEST ATTENDANCE RECORD 🚨
We've officially surpassed the attendance record set in 1936/37 when Australia faced England — a Test which spanned six days! pic.twitter.com/Kykmz8KY65
— Melbourne Cricket Ground (@MCG) December 30, 2024