Download App

जबरदस्त, शानदार ‘या’ संघाने रचला इतिहास; सलग पाच विजय अन् T20 World Cup 2026 साठी पात्र

T20 World Cup 2026 :  पुढील वर्षी भारत आणि श्रीलंका येथे होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2026) आणखी एका संघाने आपली जागा निश्चित

  • Written By: Last Updated:

T20 World Cup 2026 :  पुढील वर्षी भारत आणि श्रीलंका येथे होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2026) आणखी एका संघाने आपली जागा निश्चित केली आहे. अमेरिका प्रादेशिक पात्रता फेरीत बहामासला (Bahamas) पराभव करत टी-20 विश्वचषक 2026 साठी कॅनडाने (Canada) सलग दुसऱ्यांदा स्थान मिळवले आहे. या स्पर्धेसाठी पात्र ठरणारा कॅनडा 13 वा संघ ठरला आहे. आयसीसीने (ICC) दिलेल्या माहितीनुसार या स्पर्धेत एकूण 20 संघ भाग घेणार आहे. ज्यामध्ये भारत (India) आणि श्रीलंकासह अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांचा समावेश असणार आहे. तर इतर संघ पात्रता फेरी खेळून आपली जागा निश्चित करणार आहे.

पात्रता फेरी खेळून प्रवेश मिळवणाऱ्या सात संघांपैकी दोन संघ युरोपातून, दोन आफ्रिकेतून आणि तीन आशिया-पूर्व आशिया पॅसिफिक प्रदेशातून येणार असल्याची माहिती आयसीसीने दिली आहे.

कॅनडाने पात्रता फेरीच्या सामन्यात बहामासचा सात विकेट्सने पराभव करत आपली जागा टी-20 विश्वचषकासाठी फिक्स केली आहे. ओंटारियोमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात बहामासला अवघ्या 56 धावांवर कॅनडाने ऑलआऊट केले. कॅनडाकडून कलीम सना याने शानदार कामगिरी करत चार षटकांत सहा धावा देत तीन विकेट्स घेतले तर अंश पटेलने सात धावा देत दोन विकेट्स घेतले आणि शिवम शर्माने 16 धावा देत तीन विकेट घेतले. प्रत्युत्तरात कॅनडाने अवघ्या 33 चेंडूंत टार्गेटपूर्ण केले. कॅनडाकडून दिलप्रीत बाजवाने 36 धावांची नाबाद खेळी केली.

कॅनडाने सलग पाच सामने जिंकले

पात्राता फेरीत कॅनडाने सलग पाच सामने जिंकले आहे. आतापर्यंत त्यांनी  110 धावा, 59 धावा, 10 विकेट्स, 42 धावा आणि सात विकेट्सने सामने जिंकले आहेत. कॅनडा आणि बहामास व्यतिरिक्त, बर्म्युडा आणि केमन आयलंड देखील त्यात खेळत आहेत.

By-election Result 2025: भाजपला धक्का, गुजरातमध्ये ‘AAP’ तर केरळमध्ये काँग्रेसने मारली बाजी 

कॅनडाचा पुढचा सामना बर्म्युडासोबत आहे. 2024 मध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी त्यांनी अमेरिका प्रदेशातून पात्रता मिळवली होती.

follow us