Download App

अंतिम सामना रद्द झाला तर भारत की न्यूझीलंड कोण होणार विजेता? जाणून घ्या ICC चा नियम

Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या (Champions Trophy 2025) दुसऱ्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा

  • Written By: Last Updated:

Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या (Champions Trophy 2025) दुसऱ्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 50 धांवानी (NZvsSA) पराभव करत न्यूझीलंडने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. 09 मार्च, रविवारी रोजी आयसीसी 2025 च्या फायनलमध्ये टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये (INDvsNZ) दुबई क्रिकेट स्टेडियमवर सामान होणार आहे. ग्रुप सामन्यात याच मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना झाला होता. भारताने या सामन्यात न्यूझीलंडवर 44 धावांनी विजय मिळवला होता. तर आता पुन्हा एकदा दोन्ही संघ याच मैदानात फायनलमध्ये खेळताना दिसणार आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर जर सामना पावसामुळे रद्द झाला तर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा विजेता कोण ठरणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

क्रिकेटमध्ये अनेकदा पावसामुळे सामना पूर्ण होत नाही. त्यामुळे आयसीसी बाद फेरी सामन्यांमध्ये राखीव दिवस देखील ठेवतो. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या फायनलसाठी देखील राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. त्यामुळे 9 मार्च रोजी सामना पावसामुळे रद्द झाला तर 10 मार्च रोजी सामना जिथे थांबला आहे तिथून सुरु होईल.

तर दुसरीकडे आतापर्यंत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात फक्त एकदाच फायनल सामन्यात पाऊस आला आहे. 2002 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातील अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्या सामन्यात देखील राखीव दिवस होता मात्र राखीव दिवशी देखील पाऊस आल्याने अखेर सामना रद्द करण्यात आला होता आणि भारत आणि यजमान श्रीलंका यांना संयुक्त विजेते घोषित करण्यात आले होते.

अशोक सराफ – वंदना गुप्ते पुन्हा रुपेरी पडद्यावर, “अशी ही जमवा जमवी” चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित

अंतिम सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नाही

09 मार्च रोजी होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात पावसाची शक्यता नसल्याची माहिती अ‍ॅक्यूवेदरने दिली आहे. दुबईत 09 मार्च रोजी तापमान सुमारे 33अंश सेल्सिअस रहाण्याची अपेक्षा आहे.

follow us