सावधान टीम इंडिया! किवी संघातील ‘हा’ भारतीय ठरेल धोकादायक; आकडे काय सांगतात?

Champions Trophy Final IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) स्पर्धेतील अंतिम सामना होणार आहे. सेमी फायनल सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा (IND vs AUS) तर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. आता हे दोन्ही संघ दुबईत 9 मार्च रोजी भिडणार आहेत. भारतीय संघ तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपद पटकावण्याचा अगदी जवळ आला आहे. यासाठी फक्त न्यूझीलंडचा (IND vs NZ) पराभव करणे बाकी आहे.
याआधी साखळी सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला होता. परंतु अंतिम सामन्यातील परस्थिती एकदम वेगळी असेल. उपांत्य फेरीतील सामन्यात न्यूझीलंडने ज्या पद्धतीने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला ते पाहता टीम इंडियाची काळजी वाढली आहे. तसेच आयसीसीच्या मोठ्या सामन्यांत न्यूझीलंडने याआधी भारताचा पराभव केला आहे. त्यामुळे न्यूझीलंडला हलक्यात घेऊन चालणार नाही.
किवी संघाने सन 2000 मधील चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनल सामन्यात क्रिस केर्न्सच्या शतकाच्या बळावर 265 धावांचे लक्ष्य गाठले होते. या सामन्यात भारताचा पराभव झाला होता. यानंतर 2021 मधील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सामन्यातही न्यूझीलंडने भारताचा पराभव करत दुसरे आयसीसी विजेतेपद पटकावले होते. आता दोन्ही संघ पुन्हा आमनेसामने आले आहेत.
भारताला भारतीयाचाच धोका..
न्यूझीलंड संघातील भारतीय वंशाचा खेळाडू रचिन रवींद्र टीम इंडियासाठी धोकादायक ठरू शकतो. मोठी धावसंख्या उभारण्यात रचिन तरबेज आहे. रचिन एकदा का खेळपट्टीवर स्थिरावला की मग त्याला बाद करणे खूप कठीण असते. आतापर्यंत रचिन रविंद्रन पाच शतके केली आहेत. विशेष म्हणजे सर्व शतके आयसीसी स्पर्धांमध्येच लगावली आहेत.
वरुण-विराटची कमाल रोहितला मात्र धक्का.. आयसीसी रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा
फिरकी गोलंदाजी विरुद्ध रचिन चांगला खेळतो. भारतीय संघात स्पिनरचा भरणा आहे. त्यामुळे रचिनसाठी वेगळी रणनीती आखावी लागणार आहे. भारताकडे चार स्पिनर आहेत. आता अंतिम सामन्यात रचिन आणि स्पिनर यांच्यात द्वंद्व पाहण्यास मिळेल. कोणत्या परिस्थितीत कशा पद्धतीने फलंदाजी करायची याची जाणीव रचिनला आहे. त्यामुळे भारतीय फिरकी गोलंदाजांचे आक्रमण रचिन कसे परतवून लावील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
रचिन रवींद्र भारतीय वंशाचा आहे. त्याचे आई वडील बंगळुरू येथील आहेत. आजी आजोबा देखील भारतीय आहेत. आता रचिनचा जन्म जरी भारतात झाला नसला तरी त्याच्यात भारतीय खेळाडूंमध्ये असणारे कॅलिबर दिसून येते. रचिन टेक्निकच्या बाबतीत परिपक्व आहे म्हणून त्याला लवकरात लवकर बाद करण्यासाठी भारतीय गोलंदाजांचे प्रयत्न राहतील.
रचिन रवींद्रचे क्रिकेट करिअर
रचिन रवींद्रच्या क्रिकेट करिअर बद्दल बोलायचे झाले तर त्याने आतापर्यंत 13 कसोटी सामन्यात 1057 रन केले आहेत. यामध्ये दोन शतक आणि चार अर्धशतक आहेत. 28 एकदिवसीय डावांत रचिनने 1196 रन केले आहेत. यात पाच शतक आणि चार अर्धशतक आहेत. भारताविरुद्ध रचिनने आतापर्यंत तीन एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 96 रन केले आहेत. यात एक अर्धशतक आहे.
किवींची थेट फायनलमध्ये धडक; दुसऱ्या सेमीफायनलमध्ये आफ्रिकेचा 50 धावांनी पराभव