Download App

Champions Trophy : कोहली पुन्हा ‘किंग’; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत भारताची फायनलमध्ये धडक !

  • Written By: Last Updated:

India beat Australia : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (Champions Trophy) पहिल्या सेमीफायनलमध्ये भारताने (India) ऑस्ट्रेलियाचा (Australia) 4 विकेट्सने धुव्वा उडवत फायनल गाठली आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेले 265 धावांचे आव्हान भारताने 49 ओव्हरमध्ये गाठले. पाकिस्तानविरुद्ध शतकीय खेळी करणाऱ्या विराट कोहलीने या सामन्यात 84 धावांची शानदार खेळी करत तो विजयाचा हिरो ठरला. तर श्रेयस अय्यरने 45, अक्षरने 27, हार्दिक पंड्याने 28 आणि के. एल. राहुलने 42 नाबाद धावांची खेळी केली.

प्रथम फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने सर्वबाद 264 धावांपर्यंत मजल मारली होती. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार स्टीव्ह स्मिथने 73 धावांची खेळी केली. तर भारताकडून मोहम्मद शमीने तीन विकेट्स घेतल्या. तर रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरात टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शुभमन गिल आठ धावांवर बोल्ड झाला. त्याला बेन द्वारशुइसला बाद केले. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माही 28 धावा करून बाद झाला. कूपर कॉनोलीच्या चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्नात तो एलबीडब्लू झाला. रोहितने डीआरएस घेतला. पण उपयोग झाला नाही. 43 धावांवर दोन विकेट्स गेल्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर ही जोडी चांगली खेळ करत धावा करत होती. परंतु श्रेयस अय्यरला अॅडम झम्पाने क्लिन बोल्ड करून ही भागिदारी तोडली. कोहली आणि अय्यरने तिसऱ्या विकेटसाठी 91 धावांची भागिदारी केली. श्रेयसने 62 चेंडूत 45 धावा केल्या. विराट कोहलीला साथ देण्यासाठी आलेल्या अक्षर पटेल चांगली फलंदाजी करत होतो. पण नॅथन एलिसने त्याला बोल्ड केले. अक्षरने 30 चेंडूत 27 धावा केल्या. 35 ओव्हरमध्ये 178 धावांवर भारताच्या चार विकेट्स पडल्या. अर्धशतक झळकविणाऱ्या कोहलीला साथ देण्यासाठी के. एल. राहुल हा मैदानात आला होता.


विराटने पाया रचला, के. एल. राहुल, हार्दिक पंड्यानी कळस लावला

राहुल जोरदार फटकेबाजी करत होता. परंतु विराट कोहली हा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात झेलबाद झाला. त्याला अॅडम झम्पाने बाद केले. कोहलीने 98 चेंडूत 84 धावांची खेळी केली. त्याने चार चौकार मारले. त्यानंतर फलंदाजीला आलेला हार्दिक पंड्याने के. एल. राहुलला चांगली साथ दिली. पण विजय जवळ आला असताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात पंड्या बाद झाला. त्याने 24 चेंडूत 28 धावा केल्या. त्याने 3 षटकार आणि एक चौकार मारला. के. एल. राहुलने षटकार खेचत विजय मिळवून दिला.राहुलने नाबाद 42 धावंची खेळी केली. त्यात दोन चौकार आणि दोन षटकार मारले.


ऑस्ट्रेलिया 264 धावांवर ऑल आऊट

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरेलल्या ऑस्ट्रेलियाची म्हणावी तशी सुरुवात झाली नाही. तीन ओव्हरमध्ये केवळ चार धावा झाल्या. मोहम्मद शमीने कूपर कोनोलीला शुन्यावर बाद केले. त्यानंतर ट्रेव्हिड हेड आणि कर्णधार स्टिव स्मिथने फटकेबाजी केली. त्यानंतर पाच ओव्हरमध्ये 49 धावा झाल्या. ट्रेव्हिड हेड हा धोकादायक होत असताना वरुण चक्रवर्तीने त्याला बाद केले. तर कर्णधार स्टीव्ह स्मिथने एक बाजू लावून धरली होती. परंतु दोन वेळेस तो बाद होताना वाचला. वरुण चक्रवर्तीच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे तो रन आऊट होण्यापासून वाचला. त्यानंतर पुढच्याच चेंडू विकेटला लागला. पण बेल्स पडल्या नाही. दोन जीवनदान मिळालेल्या स्मिथने 68 चेंडूत अर्शधतक झळकविले. 73 धावांवर खेळत असलेल्या स्मिथला मोहम्मद शमीने बोल्ड करत मोठा अडथळा दूर केला. ऑस्ट्रेलियाच्या 36 ओव्हरमध्ये 4 बाद 195 धावा झाल्या होत्या. त्यामुळे हा संघ तिनशे धावांपर्यंत मजल मरेल. परंतु पुढच्याच दोन ओव्हरमध्ये स्टिव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल हे दोघे बाद झाले.


शेवटच्या पंधरा षटकांत ऑस्ट्रेलियाला झटके

तर शेवटच्या चौदा ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला केवळ 69 धावा करता आल्या. तर सहा विकेट्स गमविल्या. पण अॅलेक्स कॅरीने 57 चेंडूत 61 धावांची खेळी केली. श्रेय्यर अय्यरच्या डायरेक्ट थ्रोवर कॅरी बाद झाला. भारताकडून मोहम्मद शमीने तीन, वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

follow us