तिसऱ्या T20 साठी टीम इंडियाच्या‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये बदल; यशस्वी जैस्वालचे पदार्पण

IND vs WI : वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील आपले आव्हान टिकण्यासाठी भारतीय संघ तिसऱ्या टी-20 सामन्यात मैदानात उतरला आहे. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजने पहिला सामना 4 धावांनी आणि दुसरा सामना 2 विकेटने जिंकला. आता वेस्ट इंडिजला 5 सामन्यांची मालिका जिंकण्यासाठी आणखी एका विजयाची गरज आहे. हा सामना सुद्धा […]

Yashasvi Jaiswal

Yashasvi Jaiswal

IND vs WI : वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील आपले आव्हान टिकण्यासाठी भारतीय संघ तिसऱ्या टी-20 सामन्यात मैदानात उतरला आहे. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजने पहिला सामना 4 धावांनी आणि दुसरा सामना 2 विकेटने जिंकला. आता वेस्ट इंडिजला 5 सामन्यांची मालिका जिंकण्यासाठी आणखी एका विजयाची गरज आहे. हा सामना सुद्धा गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर आहे.

यशस्वी जैस्वाल भारतीय संघातून पदार्पण करत आहे. या दौऱ्यावर यशस्वीने भारताकडून कसोटी पदार्पण केले होते. पदार्पणाच्या कसोटीतच त्याने शतक झळकावले होते. भारताकडून T20 खेळणारा तो 105 वा खेळाडू असेल. यशस्‍वीसोबत, 2020 अंडर-19 विश्‍वचषक स्पर्धेत खेळलेला तिलक वर्मा भारतासाठी पदार्पण करणारा शेवटचा खेळाडू होता. ईशान किशन आणि रवी बिश्नोई यांना संघात स्थान मिळाले नाही. ईशानच्या जागेवर यशस्वी जैस्वाल तर बिश्नोईच्या कुलदीप यादव संघात परतला आहे.

मी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या मंचावर… पहिल्या वहिल्या लाईव्ह कॉन्सर्टसाठी सुनिधी एक्साईट

इंडिया प्लेइंग 11:
शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (C), संजू सॅमसन (WK), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार.

वेस्ट इंडीज प्लेइंग 11:
ब्रँडन किंग, काइल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (WK), रोव्हमन पॉवेल (C), शिमरॉन हेटमायर, रोमॅरियो शेफर्ड, रोस्टन चेस, अकिल हुसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅककॉय.

Exit mobile version