Download App

शेन वॉर्न नंतर या स्टार बॉलरने फेकला ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’

Matt Parkinson’s Ball Of The Century:  ऑस्ट्रेलियाचा दिवंगत फिरकीपटू शेन वॉर्नने आपल्या गोलंदाजीने भलाभल्यांना पाणी पाजले होते. शेन वॉर्नने इंग्लंडविरुद्ध ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ फेकण्याचा पराक्रमही केला होता. आता असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एका स्पिनरने शेन वॉर्नसारखा चेंडू टाकला आहे. या चेंडूला ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ असेही म्हणता येईल. या व्हिडिओने सर्वांना शेन वॉर्नची आठवण करून दिली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गज खेळाडू शेन वॉर्नने 1993 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ टाकला होता. वॉर्नच्या चेंडूचा सामना इंग्लिश फलंदाज माईक गॅटिंगने केला. या चेंडूवर गॅटिंग बाद झाला. वॉर्नचा हा चेंडू पाहून गॅटिंग पूर्णपणे चकित झाला होता. काय झाले ते फलंदाजाला समजले पण नाही. वॉर्नचा चेंडू लेगस्टंपच्या दिशेने जाताना पाहून गॅटिंगला तो सोडायचा होता, पण त्या चेंडूने इतका टर्न घेतला की तो ऑफ स्टंपला लागला.

टीम इंडियाच्या जर्सीवरुन बायजूस गायब, आता ‘ही’ कंपनी असेल प्रायोजक

आता नेमका तसाच चेंडू पुन्हा एकदा दिसून आला आहे. यावेळी इंग्लिश फिरकीपटू मॅट पार्किन्सनने हा चेंडू टाकला आहे. त्याने कौंटी क्रिकेटमध्ये हा चेंडू टाकला आहे. या चेंडूचा व्हिडिओही काउंटीच्या अधिकृत सोशल मीडियावरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये पार्किन्सन्सचा चेंडू लेग साईडच्या खाली जाताना पाहून फलंदाजाला तो सोडावासा वाटला, पण चेंडू इतका टर्न झाला की तो सरळ जाऊन ऑफ स्टंपला लागला. ‘countychampionship’ या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

Ravi kishan: सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्याची लेक होणार भारतीय सैन्यात भरती; जाणून घ्या तिच्याबद्दल

मॅट पार्किन्सनने इंग्लंड संघाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. त्याने आतापर्यंत 1 कसोटी, 5 एकदिवसीय आणि 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. पार्किन्सनने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकटमध्ये पदार्पण केले. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना जून 2022 मध्ये कसोटी (पदार्पण कसोटी) म्हणून खेळला. पार्किन्सनने कसोटीत 1, एकदिवसीय सामन्यात 5 आणि आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 7 बळी घेतले आहेत.

Tags

follow us