Download App

BCCI ला ट्रोल करणाऱ्यांना जशास तसं उत्तर; अफगाणिस्तान बोर्डाने केला मोठा खुलासा

भारतात सध्या पावसाळा सुरू आहे त्यामुळे सामन्यांमध्ये व्यत्यय येत आहे. हवामानाला तर नियंत्रित करता येत नाही.

AFG vs NZ Greater Noida : अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात ग्रेट नोएडातील शहीद विजय सिंह पथिक स्टेडियमवर टेस्ट मॅच होणार आहे. परंतु, पावसामुळे हा तीन दिवसांपासून थांबला आहे. नाणेफेक सुद्धा झालेली नाही. स्टेडियममधील खराब सुविधांचा मुद्दा उपस्थित करत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) ट्रोल केले जात आहे. आता या प्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये नेमकं काय घडलंय याची माहिती बोर्डाने दिली आहे.

बोर्डाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. आम्ही भारतात तीन पर्यायांचा विचार केला होता. देहारादून, लखनऊ आणि ग्रेटर नोएडा. परंतु, यातील देहारादून आणि लखनऊ येथील मैदानांवर सामने सुरू होते. त्यामुळे हे स्टेडियम उपलब्ध होऊ शकत नव्हते. युएईचा पर्याय होता पण तेथील सध्याच्या उष्ण हवामानात खेळणे कठीण होते. न्यूझीलंडचे शेड्यूलही व्यस्त असते. याच कारणांमुळे आम्ही ग्रेटर नोएडा निवडले होते.

रिंकू सिंगला संघात दाखल होण्यासाठी BCCI चं बोलावणं, सर्फराज, ऋषभ पंतपैकी एकाची जागा घेणार

भारतात सध्या पावसाळा (Monsoon Season) सुरू आहे त्यामुळे सामन्यांमध्ये व्यत्यय येत आहे. हवामानाला तर नियंत्रित करता येत नाही. बीसीसीआयने आमच्यासाठी अतिरिक्त मशीनरी उपलब्ध करून दिली आहे. मैदान खेळण्यायोग्य करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (Afghanistan Cricket Board) म्हटले आहे.

नेमकं काय घडलं होतं ?

ग्रेटर नोएडा येथील स्टेडियमचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पावसामुळे संपूर्ण मैदान ओले झाले होते. मैदान कोरडे करण्यासाठी इलेक्ट्रिक पंख्यांचा वापर केला गेला. यामुळे स्टेडियमशी संबंधित अधिकारी ट्रोल झाले होते. आज बुधवारी तिसऱ्या दिवशी सुद्धा सामना सुरू होऊ शकला नाही. बीसीसीआयच्या या कारभारावर टीका केली जात होते. यानंतर आता अफगाणिस्तान बोर्डाने या प्रकरणाची दुसरी बाजू समोर आणली आहे.

अफगाणिस्तानने बांग्लादेशला लोळवलं, सेमी फायनलमध्ये धडक; ऑस्ट्रेलियाचं पॅकअप

follow us