लखनऊकडून पराभूत झाल्यानंतर मुंबईचा प्लेऑफमधील मार्ग किती खरतड?

लखनऊकडून पराभूत झाल्यानंतर मुंबईचा प्लेऑफमधील मार्ग किती खरतड?

IPL 2023 playoff race : अटीतटीच्या लढतीत लखनऊने मुंबईचा पाच धावांनी पराभव केला. 178 धावांचा पाठलाग करताना मुंबईला 172 धावांवर रोखले. या विजयासह लखनऊ संघ प्लेऑफच्या अगदी जवळ पोहोचला आहे. अधिकृत क्वालिफिकेशनसाठी लखनऊला फक्त 2 गुणांची गरज आहे. लखनऊ आता तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. ईशान किशन याचे वादळी अर्धशतक व्यर्थ गेले.

178 धावांचा पाठलाग करताना मुंबईने दमदार सुरुवात केली. ईशान किशन आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी मुंबईला दमदार सलामी दिली. दोघांनी आक्रमक फलंदाजी करत डावाला आकार दिला. रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी पहिल्या विकेटसाठी 58 चेंडूत 90 धांवाची भागिदारी केली. रोहित पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्याने 25 चेंडूत 37 धावांची खेळी केली. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर ईशान किशन याने चौफेर फटकेबाजी केली. ईशाने 39 चेंडूत 59 धावांची खेळी केली.

सूर्यकुमार यादव अवघ्या सात धावा काढून तंबूत परतला. यानंतर नेहला वढेरा 16 धावांवर बाद झाला. विष्णू विनोद दोन धावांर बाद झाला. टिम डेविड 32 धावांवर नाबाद राहिला. लखनऊकडून रवि बिश्नोई आणि यश ठाकूर यांनी भेदक मारा केला. दोघांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

Pune Loksabha By Election : ..तर स्वरदा बापट पुणे लोकसभा पूर्ण ताकदीने लढवणार

लखनऊने 13 सामन्यांत 7 वा विजय मिळवला आहे. लखनऊचे 15 गुण आहेत, तर मुंबईला सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी रोहित शर्माच्या संघाला हैदराबादकडून कोणत्याही परिस्थित विजय मिळवावा लागेल.

मुंबईचा संघ शेवटचा सामना जिंकला तरी त्यांचे 14 गुण होतील. अशा स्थितीत त्यांच स्पर्धेतील स्थान इतर संघाच्या जयपराजयावर अवलंबून असेल. याचं कारण म्हणजे त्यांचा सरासरी नेट रनरेट हा -0.128 इतका आहे. आतापर्यंत त्यांना 13 सामन्यात 6 पराभवांचा सामना करावा लागला आहे तर 7 सामन्यात ते विजयी झाले आहेत. यासह ते गुणतालिकेत 14 गुणांसह चौथ्या स्थानांवर आहेत.

Marathi Movie: मराठीला चित्रपटाला येणार सुगीचे दिवस; सरकारचा मोठा निर्णय 

लखनऊचे 13 सामन्यांत 15 गुण झाले आहेत. त्यांचा नेट रनरेट गा +0.304 आहे. आयपीएल 2023 मध्ये गतविचेता गुजरातने 13 सामन्यात 18 गुण मिळवत सर्वात आधी प्ले ऑफ मधील स्थान निश्चित केले आहे. चेन्नईने 13 सामन्यात 15 गुण मिळवत तालिकेत दुसरं स्थान पटकावलं. त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी केवळ एका विजयाची आवश्यकता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube