Ben Stokes चा निवृत्तीवरुन यू-टर्न! एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन, न्यूझीलंडविरुद्धच्या इंग्लंड संघात स्थान

Ben Stokes reversed his ODI retirement : इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने निवृत्तीवरुन यू-टर्न घेत एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. स्टोक्सने गेल्या वर्षी वनडे फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती. आता मात्र स्टोक्सने पुनरागमन केले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघात स्टोक्सला जागा दिली आहे. स्टोक्सने शेवटचा वनडे जुलै 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. या फॉरमॅटमध्ये […]

Ben Stocks

Ben Stocks

Ben Stokes reversed his ODI retirement : इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने निवृत्तीवरुन यू-टर्न घेत एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. स्टोक्सने गेल्या वर्षी वनडे फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती. आता मात्र स्टोक्सने पुनरागमन केले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघात स्टोक्सला जागा दिली आहे. स्टोक्सने शेवटचा वनडे जुलै 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. या फॉरमॅटमध्ये त्याने 2924 धावा करुन त्यासोबतच 74 बळी घेतले आहेत.

शरद पवारांना भाजपची ऑफर खरी की खोटी? रोहित पवारांनी सत्य सांगितलं….

स्टोक्सने गतवर्षी जुलैमध्ये निवृत्ती घेतली होती. तब्बल एक वर्षानंतर त्याने वनडे क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. इंग्लंड क्रिकेट संघ यंदा सप्टेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. यानंतर 2023 विश्वचषतक देखील आयोजित केला जाणार आहे. इंग्लंड टीमसाठी स्टोक्सचे पुनरागमन मोठे फायदेशीर ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्टोक्स अनुभवी खेळाडू असून त्याची आत्तापर्यंतची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे.

स्टोक्स आत्तापर्यंत 105 वनडे सामने खेळला आहे. या फॉरमॅटमध्ये त्याने तीन शतकं आणि 21 अर्धशतकं केली आहेत. त्याचबरोबर 2924 धावा केल्या आहेत. स्टोक्सने 74 विकेट घेतल्या आहेत. 61 रण देऊन 5 विकेट घेणे ही त्याची वनडेमधील सर्वोत्तम कामगिरी आहे.

उद्या शिर्डीत ‘शासन आपल्या दारी’; राधाकृष्ण विखे पाटलांचे शक्ती प्रदर्शन

स्टोक्स 97 कसोटी सामने खेळला आहे. त्यात त्याने 6117 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने 13 शतकं आणि 30 अर्धशतकं केली आहेत. त्याचबरोबर त्याने व्दिशतकही झळकावले आहे. स्टोक्सने कसोटीमध्ये 197 बळी घेतले आहेत. त्याने या फॉरमॅटमध्ये चारवेळा पाच किंवा त्यापेक्षाही अधिक विकेट घेतल्या आहेत.

न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंड संघ: जोस बटलर (कॅप्टन), मोइन अली, गस एटकिंसन, जॉनी बेयरस्टो, सैम कुरेन, लियाम लिविंगस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीस टॉपले, डेविड विली, मार्क वुड, क्रिस वोक्स

Exit mobile version