ICC Released IND vs ENG Series Pitch Rating : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी (IND vs ENG Test Series) सामन्यांची मालिका आटोपली आहे. यानंतर आता आयसीसीने सामन्यांसाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्ट्यांसाठी रेटिंग जारी केली आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडमधील (India vs England) लीड्स शहरातील हेंडिंग्ले मैदानात खेळला गेला. फक्त या मैदानातील खेळपट्टी वगळता अन्य कोणतीही खेळपट्टी आयसीसीने चांगली मानलेली नाही. मालिकेदरम्यान भारत आणि इंग्लंड दोन्ही संघांचे फलंदाजांनी या पिचवर भरपूर धावा केल्या.
इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या पाच कसोटी सामन्यांचा निकाल पाचव्या दिवशी मिळाला. या पाचपैकी चार सामन्यांत एकाचा विजय तर दुसऱ्याचा पराभव झाला. एक सामना मात्र अनिर्णित राहिला. आयसीसीने हेडिंग्ले, एजबेस्टन, लॉर्ड्स आणि मँचेस्टरमधील खेळपट्ट्या आणि आऊटफील्डसाठी रेटिंग जारी केली आहे. ओव्हल येथील मैदानाची रेटिंग अद्याप प्रतिक्षेत आहे.
टीम इंडियासाठी बॅडन्यूज! दुखापतीमुळे ‘हा’ स्टार खेळाडू आशिया कपमधून बाहेर?, कधी होणार वापसी
पहिला सामना – हेडिंग्ले : पिच (चांगले), आउटफिल्ड – चांगली
दुसरा सामना – एजबेस्टन : पिच (समाधानकारक), आउटफिल्ड – चांगली
तिसरा सामना – लॉर्ड्स : पिच – (समाधानकारक), आउटफिल्ड – चांगली
चौथा सामना – ओल्ड ट्रॅफर्ड : पिच (समाधानकारक), आउटफिल्ड – चांगली
दरम्यान, दोन्ही संघातील पाच कसोटी सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत राहिली. लीड्सच्या हेडिंग्लेत खेळला गेलेला पहिला सामना इंग्लंडने पाच विकेट्सने जिंकला. बर्मिंघममधील एजबेस्टन येथे खेळला गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने 336 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावरील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने थरारक सामन्यात भारताचा 22 धावांनी पराभव केला. मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डमध्ये खेळला गेलेला चौथा सामना अनिर्णित राहिला. तसेच ओव्हल मैदानातील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना भारताने सहा धावांनी जिंकला.
Asia Cup 2025 टीम इंडियाची ‘या’ दिवशी होणार घोषणा; संजू सॅमसनला धक्का, साई सुदर्शनला संधी?