Download App

भारतातील टी20 वर्ल्डकपसाठी 13 टीम पात्र, आणखी 7 टीम बाकी; जाणून घ्या, प्रोसेस काय?

आजपासून आठ महिन्यांनंतर टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा सुरू होणार आहे. आतापर्यंत 13 संघांनी क्वालिफाय केलं आहे.

T20 World Cup 2026 Qualified Teams List : आजपासून आठ महिन्यांनंतर टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा (T20 World Cup 2026) सुरू होणार आहे. या स्पर्धांची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. या स्पर्धा भारत आणि श्रीलंकेत होणार (Team India) आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. आतापर्यंत 13 संघांनी क्वालिफाय केलं आहे. यात कॅनडा संघ (Canada Cricket Team) नव्याने दाखल झाला आहे. कॅनडा टीमने अमेरिकाज रिजनल फायनल सामना जिंकून टी 20 वर्ल्डकपसाठी क्वालिफाय केलं आहे.

या स्पर्धेचे आयोजक भारत आणि श्रीलंका असल्याने ते थेट वर्ल्डकपमध्ये दाखल झाले आहेत. तसेच 2024 मधील टी 20 वर्ल्डकपमधील टॉप 8 फिनिश करणाऱ्या टीमना सरळ एन्ट्री मिळाली आहे. मागील स्पर्धेत भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, यूएसए, अफगाणिस्तान, वेस्टइंडिज, बांग्लादेश आणि दक्षिण आफ्रिका सुपर 8 फेरीपर्यंत पोहोचले होते. यानंतर रँकिंगमधील तीन टीम वर्ल्डकपसाठी क्वालिफाय करणार आहे.

ट्रॉफी जिंकल्यानंतर विजयी मिरवणूक काढता येणार क? BCCI चे नवे 8 नियम काय?

उर्वरित 8 संघांना रिजनल क्वालिफायर्सच्या आधारावर क्वालिफिकेशन मिळेल. रिजनल क्वालिफायर्सच्या आधारावर दोन टीम आफ्रिकेतून, 3 टीम आशिया आणि पूर्व आशिया-पॅसिफिक रिजनमधून, 2 टीम युरोपातून तर एक टीम अमेरिकी क्षेत्रातून क्वालिफाय करेल.

आतापर्यंत टी 20 वर्ल्डकपसाठी भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश, अफगाणिस्तान, वेस्टइंडिज, युनायटेड स्टेट्स, आयर्लंड आणि कॅनडा या संघांनी क्वालिफाय केलं आहे. अजून सात संघांना क्वालिफाय करणे बाकी आहे. पुढील टप्प्यात युरोपातून दोन तर दोन टीन आफ्रिकेतून क्वालिफाय करतील. तीन टीम आशिया पॅसिफिक क्षेत्रातून वर्ल्डकपसाठी क्वालिफाय करतील. 2024 टी20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन वेस्टइंडिज आणि अमेरिकेने संयुक्तपणे केले होते. या स्पर्धेत भारताने दक्षिण आफ्रिकेचा (India vs South Africa) पराभव करत इतिहास रचला होता.

सामना अनिर्णित अन् ‘हा’ दिग्गज कसोटी क्रिकेटमधून निवृत्त; 16 वर्षांच्या करिअरला फुलस्टॉप!

follow us