IND vs ENG Series 2025 : टीम इंडिया येत्या 20 जूनपासून इंग्लंड विरुद्ध (IND vs ENG) पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात करणार आहे. सध्या भारतीय संघातील खेळाडू सराव करत आहेत. खेळाडू आजपासून इंट्रा स्क्वॉड प्रॅक्टिस मॅच खेळणार आहे. हा सामना (Team India) 16 जूनपर्यंत राहणार आहे. फक्त सिनियर पुरुष संघच नाही तर अंडर 19 संघ आणि महिला टीमही इंग्लंडचा (India Tour of England 2025) दौरा करत आहेत.
यातच भारतीय महिला क्रिकेट संघाला धक्का (Indian Women Cricket Team) देणारी बातमी आली आहे. सरावा दरम्यान महिला खेळाडू सुची उपाध्याय दुखापतग्रस्त झाली. त्यामुळे आता तिला या संपूर्ण मालिकेतूनच माघार घ्यावी लागली आहे. बीसीसीआयने या (BCCI) खेळाडूच्या जागी पर्यायी खेळाडूची घोषणाही केली आहे.
सुची उपाध्याय जखमी झाल्यानंतर तिच्या जागी बीसीसीआयने राधा यादवच्या नावाची घोषणा केली आहे. सरावा दरम्यान सुची उपाध्यायच्या डाव्या पायाला दुखापत झाली. तिची दुखापत मोठी असल्याने तिला या दौऱ्यातूनच माघार घ्यावी लागली आहे.
टी 20 रँकिंगमध्ये टीम इंडियाचा दबदबा, पहिला नंबरही मिळवला; ‘या’ खेळाडूला पछाडणे कठीणच
इंग्लंड दौऱ्यात भारतीय महिला टीम पाच टी20 सामने खेळणार आहे. यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांचीही मालिका होणार आहे. पहिला टी20 सामना 28 जूला होणार आहे. तर अखेरचा सामना 12 जुलै रोजी होणार आहे. यानंतर 16 जुलैपासून एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील अखेरचा सामना 22 जुलै रोजी होणार आहे.
भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या महिला वनडे वर्ल्डकपच्या आधी होणारी ही सिरीज महत्वाची आहे. वर्ल्डकप 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर या काळात होणार आहे. यात एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. एकूण 31 सामने खेळवले जाणार आहेत. 2 नोव्हेंबरला फायनल सामना बंगळुरूत होणार आहे. जर पाकिस्तान फायनलमध्ये पोहोचला तर हा सामना श्रीलंकेतील कोलंबोत आयोजित करावा लागेल.
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, ऋचा घोष, यास्तिका भाटिया, हरलीन देयोल, दिप्ती शर्मा, स्नेह राणा, श्रीचरणी, अमनज्योत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, सयाली सतघरे, राधा यादव.
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देयोल, जेमिमा रोड्रिग्स, ऋचा घोष, यास्तिका भाटिया, तेजल हसबनीस, दिप्ती शर्मा, स्नेह राणा, श्रीचरणी, अमनज्योत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, सयाली सतघरे, राधा यादव.
ENG vs WI : वनडेनंतर टी 20 तही विंडीजचा सुपडा साफ; इंग्लंडचा विजयी षटकार