Download App

Champions Trophy : भारताने नकार देताच पाकिस्तानचा नवा फॉर्म्यूला; BCCI मंजूर करणार?

Champions Trophy 2025 : पुढील वर्षी पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्ऱॉफी (Champions Trophy 2025) स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही हे निश्चित झालं आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची डोकेदुखी वाढली आहे. अद्याप या समस्येवर कोणताही (Pakistan Cricket Board) तोडगा अद्याप निघालेला नाही. हायब्रीड मॉडेलवर खेळण्यास पाकिस्तान बोर्ड तयार नाही. त्यामुळे आयसीसीने अजूनही स्पर्धेचे वेळापत्रक तयार केलेले नाही. पाकिस्तानला तब्बल 28 वर्षांनंतर आयसीसी स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. ही संधी हातची जाऊ देण्याची पाकिस्तानची इच्छा नाही. यामुळे आणखी एक नवा मार्ग शोधण्यात आला आहे.

पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार स्पर्धा आयोजित करण्याच्या उद्देशाने पाकिस्तान यात काही बदल करण्याची शक्यता आहे. साखळी फेरीतील तीन सामन्यांपैकी एक तरी सामना भारतीय संघाने पाकिस्तानात खेळावा अशी बोर्डाची इच्छा आहे. उर्वरित सामने अन्य देशांत खेळवण्याची बोर्डाची तयारी आहे.

Asian Champions Trophy 2024: चीनचा धुव्वा उडविला; भारत पाचव्यांदा आशियाई चॅम्पियन

जर भारतीय संघ सेमी फायनलमध्ये पोहोचला तर हा सामना देखील दुसऱ्या देशात होईल. पण जर टीम इंडियाने फायनल सामन्यात प्रवेश मिळवला तर हा सामना पाकिस्तानातच होईल असे बोर्डाला वाटत आहे. हा सामना लाहोरमध्ये होईल. अशात टीम इंडिया (Team India) स्पर्धेतील बाकीचे सामने युएई किंवा श्रीलंकेत खेळण्याची शक्यता आहे.

बीसीसीआयचं म्हणणं काय

भारतीय संघाने 2008 नंतर पाकिस्तानचा एकही दौरा केलेला नाही. दोन्ही देशांतील संबंध बिघडलेले आहेत. त्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानात जात नाही. सरकारकडून याची परवानगी मिळत नाही. या दोन्ही संघात आयसीसी विश्वचषक आणि आशिया कप स्पर्धेतच सामने होतात. आता चॅम्पियन्स ट्ऱॉफी हायब्रीड मॉडेल पद्धतीने व्हावी अशी बीसीसीआयची इच्छा आहे. 2023 मध्ये झालेल्या आशिया कप स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानला मिळालं होतं. त्यावेळी भारतीय संघ पाकिस्तानला गेला नव्हता. त्यामुळे भारताचे सामने हायब्रीड पद्धतीने झाले होते.

ICC Champions Trophy 2025 साठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयकडून भूमिका स्पष्ट

follow us