Team India Cricketers : भारतीय संघाला आगामी काळात बांगलादेश विरुद्ध दोन कसोटी (IND vs BAN) सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी लवकरच संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. टेस्ट सिरीज मध्ये रोहित शर्मा, विराट कोहली खेळताना (Virat Kohli) दिसणार आहेत. काही युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट संघाने नुकताच श्रीलंकेचा दौरा केला होता. या दौऱ्यात टीम इंडियाने (Team India) तीन टी 20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळले होते. टी 20 मालिकेत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात (Surya Kumar Yadav) भारतीय संघाने श्रीलंकेचा सुपडा साफ केला होता. तर वनडे सीरिजमध्ये श्रीलंकेने टी 20 मधील पराभवाचा वचपा काढत 2-0 अशा फरकाने मालिका (IND vs SL) जिंकली होती.
वनडे सीरिजमध्ये रोहित शर्माच कर्णधार होता. हा दौरा संपल्यानंतर भारतीय खेळाडूंना 43 दिवसांची सुट्टी मिळाली आहे. ब्रेक नंतर 19 सप्टेंबर पासून भारतीय संघ बांग्लादेश विरुद्ध (Bangladesh Cricket) दोन टेस्ट मॅच आणि तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. कसोटी मालिकेसाठी लवकरच संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. या संघात रोहित विराट या दिग्गज खेळाडूंप्रमाणेच युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. संघ निवडीचा हाच संभाव्य पॅटर्न न्युझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकांसाठी वापरली जाऊ शकते.
युवा खेळाडूंना प्राधान्य मिळाले तर काही खेळाडूंची मोठी अडचण होणार आहे. त्यांना भारतीय संघात वापसी करणे कठीण होणार आहे. हेच खेळाडू एकेकाळी टीम इंडियाचे मजबूत आधार स्तंभ होते. परंतु वाढत्या वयाबरोबर त्यांची क्रेडीबिलिटी आता कमी झाली आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये (Test Cricket) या खेळाडूंची वापसी होणे अतिशय कठीण आहे.
यूएस ओपनमध्ये मोठा उलटफेर! नोवाक जोकोविचला पराभवाचा धक्का; स्पर्धेतूनही बाहेर
पुजाराने आपला शेवटचा सामना मागील वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये खेळला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या सामन्यात त्याने 41 धावा केल्या होत्या. यानंतर पुजाराला कसोटी संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. पुजाराची बॅटिंग पोजिशन नंबर तीन आहे. आता या ठिकाणी शुभमन गिल फलंदाजी करतो. मागील काही वर्षांपासून पुजाराच्या कामगिरीत घसरण झाली होती त्यामुळे त्याला संधी मिळाली नाही. मागील 28 कसोटी सामन्यात पुजाराने फक्त एक शतक आणि 11 अर्धशतके केली. डिसेंबर 2011 मध्ये चितगाव येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात 90 आणि 102 धावांची खेळी वगळता त्याची कामगिरी निराशाजनक राहिली.
पुढील वर्षात होणाऱ्या काउंटी चॅम्पियनशिप मधूनही त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. पुजारा काउंटी क्रिकेटमध्येही चांगले प्रदर्शन करत होता तरी देखील त्याला संधी मिळाली नाही. 36 वर्षांच्या पुजाराचे क्रिकेट करियर शानदार राहिले आहे. पुजाराने 103 कसोटी सामन्यात 7195 रन केले आहेत. 19 शतक आणि 35 अर्ध शतके त्याच्या नावावर आहेत.
जवळपास दीड वर्ष बाहेर राहिल्यानंतर मागील वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल मॅच द्वारे अजिंक्यने क्रिकेटमध्ये वापसी केली होती. या संधीचा त्याला फायदा घेता आला नाही. यावेळीही त्याची कामगिरी सुमार राहिली. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने त्याला पुन्हा ब्रेक दिला. आता श्रेयस अय्यर आणि अन्य खेळाडू असताना अजिंक्यला संधी मिळणे खूप कठीण झाले आहे. 36 वर्षीय अजिंक्य रहाणेने एकूण 85 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांत त्याने 5077 धावा केल्या आहेत. यामध्ये 12 शतक आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे.
वेगवान गोलंदाज उमेश यादव अनेक दिवसांपासून संघाबाहेर आहे. उमेशने त्याचा शेवटचा सामना जून 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला होता. 36 वर्षांच्या उमेशने आतापर्यंत 57 कसोटी, 75 वनडे आणि 9 टी 20 सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यांत त्याने 170 विकेट्स घेतल्या आहेत. वनडे क्रिकेट मध्ये 106 आणि टी 20 क्रिकेटमध्ये 12 विकेट्स घेतल्या आहेत.
‘शिखर’नंतर या 11 खेळाडूंचंही होणार पॅकअप; संघात संधीच नाही, फक्त घोषणाच बाकी
एमएस धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर ऋद्धीमान साहाला अनेक संधी मिळाल्या होत्या. परंतु या संधीच सोनं करता आलं नाही आणि साहाच्या करिअरला उतरती कळा लागली. सन 2021 मध्ये ऋद्धीमान साहाने त्याचा अखेरचा सामना न्युझीलंड विरुद्ध खेळला होता. यानंतर त्याला टीम इंडियात वापसी करता आली नाही. 39 वर्षीय ऋद्धीमान साहाने 40 टेस्ट आणि 9 वनडे सामने खेळले आहेत. टेस्टमध्ये 1353 तर वनडे मध्ये 41 रन त्याने केले आहेत. आता केएस भरत, रिषभ पंत, ध्रुव जूरेल यांच्यासारख्या युवा खेळाडूंमुळे साहाला संघात वापसी करणे कठीण आहे.
एकेकाळी इशांत शर्मा भारतीय कसोटी संघाचा महत्त्वाचा गोलंदाज होता. पण आता त्याचं करिअर संपल्यात जमा आहे. इशांतने भारतीय संघात असताना एकूण 102 कसोटी, 80 वनडे आणि 14 टी 20 सामने खेळले आहेत. इशांतने कसोटीमध्ये 311 विकेट्स घेतल्या आहेत. वनडे सामन्यांमध्ये 115 आणि टी 20 मध्ये 8 विकेट्स घेतल्या आहेत. नोव्हेंबर 2021 मध्ये इशांतने अखेरचा कसोटी सामना खेळला होता. आता 35 वर्षीय इशांत क्वचितच संघात परतू शकतो. कारण संघ व्यवस्थापन आणि युवा खेळाडूना जास्तीत जास्त संधी देत आहे.