यूएस ओपनमध्ये मोठा उलटफेर! नोवाक जोकोविचला पराभवाचा धक्का; स्पर्धेतूनही बाहेर

यूएस ओपनमध्ये मोठा उलटफेर! नोवाक जोकोविचला पराभवाचा धक्का; स्पर्धेतूनही बाहेर

Novak Djokovic US Open 2024 : यूएस ओपन स्पर्धेत एक मोठा उलटफेर झाला आहे. सर्बियाचा स्टार टेनिस खेळाडू नोवाक जोकोव्हिचला पराभवाचा धक्का बसला आहे. या पराभवानंतर स्पर्धेतून बाहेर होण्याची नामुष्की जोकोविचवर ओढवली. ऑस्ट्रेलियन टेनिस खेळाडू अॅलेक्सी पोपियनने जोकोविचचा पराभव केला. आर्थर एश स्टेडियममध्ये खेळण्यात आलेल्या या सामन्यात दुसऱ्या फेरीत 4-6, 4-6, 6-2, 4-6 अशा फरकाने जोकोविचला पराभव स्वीकारावा लागला. हा सामना एक तास 19 मिनिटे चालला. 18 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं आहे की जोकोविच यूएस ओपनच्या चौथ्या राउंडमध्ये पोहोचू शकला नाही. जोकोविच 2017 नंतर पहिल्यांदा कोणतेही ग्रँड स्लॅम न जिंकताच राहणार आहे.

अल्काराजची ऑलिम्पिक चॅम्पियन बनण्याची संधी हुकली, नोव्हाक जोकोविचने पटकावले सुवर्णपदक

जोकोविचच्या आधी स्पॅनिश खेळाडू कार्लोस अल्कारेजही तिसऱ्या फेरीत पराभूत होऊन स्पर्धेबाहेर झाला. सर्वाधिक सिंगल्स ग्रँड स्लॅम पुरस्कार जिंकण्याच्या बाबतीत जोकोविच आणि ऑस्ट्रेलियन महिला खेळाडू मार्गरेट कोर्ट बरोबरीत आहेत. दोघांनी संयुक्तपणे सर्वाधिक 24 ग्रँड स्लॅम सिंगल्स टायटल जिंकले आहेत. मार्गारेटने यातील 13 पुरस्कार ओपन एरा आधी जिंकले आहेत. टेनिसमध्ये ओपन एराची सुरुवात 1968 मध्ये झाली होती. जोकोविचने त्याच्या टेनिस करियरमध्ये एकूण 37 ग्रँड स्लॅम सिंगल्स फायनल खेळले आहेत. स्विटजरलँडचा दिग्गज खेळाडू रॉजर फेडरर आणि स्पॅनिश स्टार राफेल नदाल यांनाही जोकोविचने मागे टाकले आहे.

आजच्या सामन्यात त्याने 14 डबल फॉल्ट केले आणि 49 अनफोर्स एरर केले. 2017 नंतर प्रथमच अशी वेळ आली आहे जेव्हा जोकोविच एकाही विजेतेपदा शिवाय सीझनचा शेवट करेल. याआधी ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये जॉनिक सिन्नरने त्याला पराभवाची धूळ चारली होती. त्यानंतर कार्लोस अल्काराजने फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकावत जोकोविचला हार मानण्यास भाग पाडले होते.

कार्लोस अल्काराझने अंतिम फेरीत सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविच (Wimbledon) याचा सरळ सेटमध्ये ६-२,६-२,७-६ असा पराभव करून इतिहास रचला होता. (Novak Djokovic) या विजयासह कार्लोस अल्काराझने सलग दुसऱ्यांदा विम्बल्डनचे विजेतेपद पटकावलं होतं. या पराभवाची भरपाई करून जोकोविच यूएस ओपन स्पर्धेत विजयी होईल असे वाटले होते. परंतु, येथेही पराभव झाल्याने त्याचं पुरस्कार जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे.

नोव्हाक जोकोविचचं पुन्हा एकदा स्वप्न भंगल! कार्लोस अल्काराझने पटकावले विम्बल्डनचे विजेतेपद

follow us
  • fb
  • instagram
  • youtube