कसोटीत ‘डक’ आऊट होणारे पाच खेळाडू; एका भारतीयाचाही समावेश
Test Cricket : एकदिवसीय आणि टी 20 क्रिकेटच्या तुलनेत कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करणे कठीणच असते. कारण लाल चेंडू जास्त फिरकी घेतो. त्यामुळे एक एक रन करण्यासाठी सुद्धा मोठा संघर्ष करावा लागतो. त्यामुळे विकेट पडण्याची शक्यता जास्त राहते. कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) फलंदाज जास्त वेळेस शून्यावर बाद झाल्याचे तुम्हाला दिसतील. चला तर मग जाणून घेऊ या अशा पाच खेळाडूंबद्दल जे जास्त वेळा शून्यावर बाद झाले आहेत.
कोर्टनी वॉल्श
सन 1984 ते 2001 पर्यंत वेस्ट इंडिजच्या (West Indies) कोर्टनी वॉल्शने एकूण 132 कसोटी सामने खेळले होते. या दरम्यान त्यांनी एकूण 185 डावांमध्ये फलंदाजी केली. यामध्ये कोर्टनी वॉल्श 43 वेळा शून्यावर बाद झाले. सर्वात जास्त वेळा शून्यावर बाद होणारा खेळाडू म्हणून कोर्टनी वॉल्श (Courtney Walsh) आघाडीवर आहेत.
स्टुअर्ट ब्रॉड
इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने (Stuart Broad) 2007 ते 2023 या काळात एकूण 167 कसोटी सामने खेळले. या सामन्यांतील 244 डावात फलंदाजी केली. यामध्ये ब्रॉड 39 वेळा शून्यावर बाद झाला. आता स्टुअर्ट ब्रॉडने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ब्रॉडच्याच गोलंदाजीवर भारताच्या युवराज सिंगने सहा चेंडूत सहा षटकार मारण्याचे रेकॉर्ड केले होते.
Team India : हार्दिक पांड्याला पुन्हा धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू होणार भारतीय संघाचा कर्णधार
क्रिस मार्टिन
न्यूझीलंडच्या क्रिस मार्टिनने (Chris Martin) 2000 ते 2013 या काळात एकूण 71 कसोटी सामने खेळले. या दरम्यान 104 डावांत फलंदाजी केली. यामध्ये क्रिस मार्टिन 36 वेळा शून्यावर बाद झाला होता.
ग्लेन मॅक्ग्रा
ऑस्ट्रेलियाचा यशस्वी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅक्ग्राने (Glenn Mcgrath) अनेक सामने एकहाती जिंकून दिले आहेत. 1993 ते 2007 या काळात ग्लेन मॅक्ग्राने एकूण 124 कसोटी सामने खेळले. या दरम्यान त्याने 134 इनिंगमध्ये 35 वेळा शून्यावर आऊट होण्याचाही विक्रम केला.
Team India : विजयाचा जल्लोष, वानखडे स्टेडियममध्ये टीम इंडियाने धरला ढोल ताशावर ठेका, पाहा व्हिडिओ
इशांत शर्मा
सन 2007 ते 2021 या काळात भारतीय वेगवान गोलंदाज इशांत शर्माने (Ishant Sharma) एकूण 105 कसोटी सामने खेळले. या सामन्यांतील 142 डावांत फलंदाजी करण्याची संधी त्याला मिळाली. यामध्ये इशांत शर्मा 34 वेळा शून्यावर बाद झाला. इशांत शर्मानेही आता क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.