Download App

कसोटी क्रिकेटमधील रोहित शर्माचे ‘हे’ 5 मोठे विक्रम, अजून कोणीच मोडू शकलेलं नाही

Rohit Sharma Five Big Records In Test Cricket Match : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील खराब कामगिरीमुळे (Cricket) रडारवर आहे. खराब कामगिरीमुळे कदाचित रोहित सिडनी कसोटी सामन्यातून बाहेर जाऊ शकतो. रोहित शर्मा फलंदाजी करू न शकल्याने टीम इंडियाला मोठा फटका बसलाय. पण रोहित शर्माच्या नावावर असे काही विक्रम आहेत, जे कोणी अजून मोडू शकलेलं नाही. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) या पाच विक्रमांबद्दल जाणून घेऊ या.

भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्माने 2013 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण केलं होतं. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात रोहित शर्माने फलंदाजी करताना शतक (Test Cricket Match) झळकावले. पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारे खेळाडू जगात फार कमी आहेत, त्यात रोहित शर्माचं नाव आहे. सलामीच्या फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला रोहित शर्मा पदार्पणात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने 177 धावांची स्फोटक खेळी केली. या डावात रोहित शर्माने 301 चेंडूंचा सामना केला, ज्यात त्याने 23 चौकार आणि 1 षटकारही लगावला.

वाल्मिक कराडचे ते 22 दिवस, एसआयटी अन् मुंडेंची मदत; खासदार बजरंग बाप्पांनी सगळंच काढलं

सध्या क्रिकेटमध्ये, रोहित शर्मा भारतीय संघासाठी कसोटी स्वरूपाच्या दोन्ही डावांमध्ये शतके झळकावणाऱ्या मोजक्या फलंदाजांपैकी एक आहे. रोहित शर्माने 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 176 आणि 127 धावांची इनिंग खेळली (Rohit Sharma Five Big Records) होती.

कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी सातव्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहितने 2013 मध्ये रविचंद्रन अश्विनसोबत 280 धावांची भागीदारी केली होती. भारतासाठी सातव्या विकेटसाठी यापेक्षा मोठी भागीदारी झालेली नाही. त्याचबरोबर सातव्या विकेटसाठी केलेल्या भागीदारीच्या बाबतीत अश्विन आणि रोहित जगात चौथ्या स्थानावर आहेत.

मोठी बातमी! पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली, आता कोण सांभाळणार कार्यभार?

रोहित शर्मा हा अशा काही भारतीय खेळाडूंपैकी एक आहे, ज्याने सलग पाच कसोटी सामन्यांमध्ये 50 किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा विक्रम केलाय. यामध्ये 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध झालेल्या नागपूर कसोटी सामन्यातील 102 धावांच्या नाबाद खेळीचा समावेश आहे. या बाबतीत रोहितचा भारतातील दिग्गज सुनील गावस्कर आणि गुंडप्पा विश्वनाथ यांसारख्या फलंदाजांच्या यादीत समावेश आहे. रोहित शर्मा त्याच्या स्फोटक फलंदाजीसोबतच त्याच्या षटकारांच्या ताकदीसाठीही ओळखला जातो. रोहितने टीम इंडियासाठी आतापर्यंत कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 सामन्यात एकूण 624 षटकार मारलेत, अशी कामगिरी करण्यात रोहित शर्मा जगात पहिल्या क्रमांकावर आहे.

 

follow us