वाल्मिक कराडचे ते 22 दिवस, एसआयटी अन् मुंडेंची मदत; खासदार बजरंग बाप्पांनी सगळंच काढलं

वाल्मिक कराडचे ते 22 दिवस, एसआयटी अन् मुंडेंची मदत; खासदार बजरंग बाप्पांनी सगळंच काढलं

MP Bajrang Sonawane : राज्याच बहुचर्चित असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) अनेक नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणी सीआयडीकडून चार जणांना अटक केली असून मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडही (Walmik Karad) अखेर शरण आले आहेत. या संपूर्ण प्रकरणी बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे (MP Bajrang Sonawane) यांनी अनेक संशय व्यक्त केले आहेत. यामध्ये देशमुख हत्या प्रकरणापासूनचे वाल्मिक कराडचे 22 दिवस, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने स्थापन झालेली एसआयटी आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडला केलेल्या मदतीबाबत गंभीर आरोप बजरंग सोनवणे यांनी केले आहेत. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मोठी बातमी : सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आता मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत होणार; मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी

यावेळी बोलताना खासदार सोनवणे म्हणाले, संतोष देशमुख हत्या प्रकरणाची नोंद झाली तेव्हा वाल्मिक कराड उज्जैनहून परळीकडे जात होता, म्हणजे 12 तारखेला कराड परळीत होता. वाल्मिक कराड कुठे फरार होता, एवढे दिवस त्याला कोणी मदत केलीयं, याबाबत शासकीय यंत्रणा का लपवत आहे माहिती नाही पण ज्या नेत्यासोबत हा माणूस काम करीत आहे, त्यांच्यासोबत त्याची भेट झाली, तेव्हा पोलिसांनी याला अटक केली नाही. आरोपी नेत्यांच्या फार्महाऊसवर भेटला तेव्हाही केली नाही, एवढंच नाही तर हिवाळी अधिवेशनादरम्यान, आरोपी नागपुरात होता. तेव्हादेखील वाल्मिक कराडला अटक केली नसल्याचा आरोप खासदार सोनवणे यांनी केला आहे.

नववर्षात शेतकऱ्यांना गुडन्यूज! डीएपी खत स्वस्तात मिळणार; सरकारकडून अनुदान जाहीर

तसेच नागपुरनंतर वाल्मिक कराड हा मध्यप्रदेशात गेला त्यानंतर पंचमंडून पुणे, गोवा नंतर कर्नाटक आणि कर्नाटकाहून पुण्यात आला. संपूर्ण प्रवासात यंत्रणेला कराडबद्दल माहिती मिळाली नाही का? त्यानंतर 12 वाजता जेव्हा त्याने शणागतीची घोषणा केली तेव्हा अनेक कार्यकर्ते पुण्यात दाखल झाले. त्यावेळी कराडची लोकांना माहिती पण सीआयडीला माहिती नाही. वाल्मिक कराड 22 दिवस हजर का झाला नाही? या दिवसांत त्याला कोणी कोणी मदत केलीयं, यामध्ये आम्हाला संशय वाटत असून पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे, अशी मागणीही खासदार सोनवणे यांनी केलीयं.

अजितदादांच्या ताफ्यातच वाल्मिक कराड होता..
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर ज्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार देशमुख कुटुंबियांच्या सांत्वनासाठी आले. त्यावेळी त्यांच्या ताफ्यातील गाडीत वाल्मिक कराड होता. त्याच गाडीतून तो पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला. त्या गाडीमालकालाही सहआरोपी करा, या प्रकरणातील अनेक लोकं फरार आहेत. पोलिसांवर नेमकं कोण दबाव टाकतंय, सीआयडीवर कोण टाकतंय, जो आरोपी शरण येतोयं तो तुम्हाला सापडत का नाही? जिथं व्हिडिओ शूट झालायं तिथं आरोपी कसा वागतोय पाहा कोणाच्या घरात होता त्याची तपासणी करा, ज्या घरात आरोपी आहे त्याच संघटनेचे लोकं आमच्याविरोधात आंदोलन करीत आहेत, या खंडणीखोराचा कुठं कुठं संबंध हे शोधा, अशी मागणीही सोनवणे यांनी केलीयं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube