मते घेईपर्यंत गोड बोलले, आता त्यांची जात जागी झाली…; जरांगेंचा अमोल कोल्हेंसह बजरंग सोनवणेंवर निशाणा

मते घेईपर्यंत गोड बोलले, आता त्यांची जात जागी झाली…; जरांगेंचा अमोल कोल्हेंसह बजरंग सोनवणेंवर निशाणा

Manoj Jarange Patil :  मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (Maratha Reservation) देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केली आहे. त्यांनी सरकारला 13 जुलैपर्यंतची वेळ दिली आहे. तर त्यांच्या या मागणीला ओबीसी नेत्यांनी जोरदार विरोध केला. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी खासदार अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) मराठा आरक्षणासंदर्भात संसदेत मांडलेल्य भूमिकेवरून जरागेंनी कोल्हेंसह बजरंग सोनवणेंना (Bajrang Sonawane) चांगलच सुनावलं.

टीम इंडिया पाकिस्तानला जाणार? शक्यता नाहीच, बीसीसीआयने दिले दोन पर्याय 

मराठ्यांची मते घेईपर्यंत हे नेते गोड बोलतात, पण मते मिळाल्यानंतर त्यांची जात जागी झाली, अशी टीका जरांगेंनी केली.

मनोज जरांगे यांची आज बीडमध्ये शांतता रॅली आहे. या रॅलीपूर्वी एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी अमोल कोल्हे, बजरंग सोनवणे यांच्यासह महाविकास आघाडीवर टीका केली. कोल्हे यांनी संसदेत महाराष्ट्रात जात जनगणनेची मागणी करत कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली होती. तर त्यांच्या भूमिकेचे बजरंग सोनवणे यांनी बाके वाजवून स्वागत होते. या दोन्ही नेत्यांच्या घेतलेल्या भूमिकेवर जरांगेंनी संताप व्यक्त केला.

ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकांना गुडन्यूज, विलंब शुल्क रद्द; मंत्री दादा भुसेंची घोषणा 

ते म्हणाले की, मराठ्यांची मते घेईपर्यंत गोड बोलायचे आणि एकदा मते मिळाली की, त्यांची जात जागी होते. आमच्या मराठ्यांना हेच कळाले नाही. पण, आता त्यांचे डोळे उघडलेत. मराठ्यांनी एकाला खासदार केले, पण नंतर तो बदलला. आता पुढची 5 वर्षे काहीच होणार नाही असे त्याला वाटत असेल. पण, आमदारकीला त्याच्या जीवाभावाचे कुणी ना कुणी तरी उभे राहतीलच की. मराठे त्याला पाडतील, असा इशारा जरांगेंनी दिला.

काही अतृप्त आत्मे आमच्यातही हेत. त्यांच्यातील काही अभ्यासक व समन्वयक आहेत. या लोकांना माझे काम बघवत नाही, असंही जरांगे म्हणाले.

आरक्षण देऊ नये ही मविआची भूमिका आहे का?
मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीकडे विरोधी पक्षाने पाठ फिरवली. त्यामुळं जरांगेनेही विरोधकांवर निशाणा साधला. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी सर्व आमदारांनी प्रयत्न करावेत. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधकांनी जाण्याची गरज होती. मराठा समाजाला आरक्षण देऊ नये या मागणीला महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे का? असा सवाल जरांगेंनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube