Cricketers Salary All Countries 2025 : क्रिकेट या खेळाची लोकप्रियता जगात सातत्याने वाढत चालली आहे. 2028 मध्ये अमेरिकेत होणाऱ्या ऑलिम्पिक्स स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) 2024-25 हंगामासाठी सेंट्रल कॉन्ट्र्रॅक्ट लिस्ट जारी केली आहे. (BCCI Central Contract List 2025) विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना नेहमीप्रमाणे कोट्यावधी रुपये मानधन मिळत राहील. पण तुम्हाला माहिती आहे का की जगातील अन्य देशांच्या क्रिकेटपटूंना पगार मिळतो नाही ना.. चला तर मग खेळाडूंच्या पगाराची माहिती घेऊ या..
बीसीसीआयने खेळाडूंना चार ग्रेडमध्ये विभागले आहे. ग्रेड A+ मधील खेळाडूंना वार्षिक 7 कोटी रुपये पगार मिळेल. ग्रेड A मधील खेळाडूंना 5 कोटी, ग्रेड B मधील खेळाडूंना 3 कोटी रुपये तर ग्रेड C मधील खेळाडूंना 1 कोटी रुपये मिळतील. आता अन्य क्रिकेट संघातील खेळाडूंना किती पगार मिळतो यावर नजर टाकू या..
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) यावर्षी कॉन्ट्रॅक्टच्या रकमेत 7.5 टक्क्यांची वाढ केली आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मिळणारा सरासरी पगार 8.1 कोटी रुपये आहे. ऑस्ट्रेलियात टॉप कॉन्ट्रॅक्ट मिळवणारा खेळाडू वर्षाला साधारण 25 कोटी रुपयांपर्यंत कमाई करू शकतो.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही (Pakistan Cricket Board) त्यांच्या खेळाडूंना चार ग्रेडमध्ये विभागले आहे. ग्रेड A मधील खेळाडूंना 1.6 कोटी रुपये, ग्रेड B मधील खेळाडूंना 1.1 कोटी रुपये, ग्रेड C मधील खेळाडूंना 64.5 लाख रुपये इतका पगार दिला जातो.
विवाहबाह्य संबंध, हुंड्यासाठी मारहाण अन् उपाशी ठेवायचा; प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या बायकोचे गंभीर आरोप
दक्षिण आफ्रिका क्रिकेट (South Africa Cricket) संघातील खेळाडूंना पगार त्यांची कामगिरी आणि अनुभवाच्या आधारावर दिला जातो. सेंट्र्ल कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधील खेळाडूंचा पगार 64 लाख ते 1.7 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
न्यूझीलंडच्या खेळाडूंचा (New Zealand Cricket) पगार पाच वर्षांच्या कराराच्या आधारावर असतो. यामध्ये प्रमोशनचाही सहभाग असतो. न्यूझीलंडच्या खेळाडूंचा पगार 2.6 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
बांग्लादेशने त्यांच्या क्रिकेट (Bangladesh Cricket) संघातील खेळाडूंना पाच कॅटेगरीत विभागले आहे. ग्रेड A+ मधील खेळाडूंना 84 लाख भारतीय रुपये आहे. ग्रेड A मधील खेळाडूंचा पगार 67 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
इंग्लंड संघातील वरिष्ठ खेळाडू एका वर्षात 9 कोटी रुपयांपर्यंत कमाई करू शकतो. याव्यतिरिक्त एक कसोटी सामन्यासाठी 14 लाख रुपये आणि एकदिवसीय सामन्यासाठी 5 लाख रुपयांचे वेगळे उत्पन्न खेळाडू मिळवतात.
श्रीलंका संघातील (Srl Lanka Cricket) खेळाडूंचा पगार त्यांच्या कामगिरीवर आधारीत असतो. श्रीलंका संघातील टॉप खेळाडू एका वर्षात 60 लाख ते 85 लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकतो.
पाकिस्तानची नवी चाल! विश्वकप स्पर्धेसाठी टीम भारतात पाठवणार नाही; नेमकं काय घडलं?
वेस्टइंडिज खेळाडूंना सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट (West Indies Cricket) आणि मॅच फीसच्या आधारावर पगार दिला जातो. दोन फॉरमॅटमध्ये खेळलेला क्रिकेटर वर्षाला 2 कोटी रुपयांपर्यंत कमाई करू शकतो. तीन फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळलेला खेळाडू एक वर्षात 2.5 कोटी रुपयांपर्यंत कमाई करू शकतो.
अफगाणिस्तान क्रिकेट संघातील (Afghanistan Cricket) खेळाडूंना दर महिन्याला पगार दिला जातो. अफगाणिस्तानचे खेळाडू एक महिन्यात 1 ते 2.8 लाखांपर्यंत कमाई करू शकतात. याबरोबरच त्यांनी टी 20 वर्ल्डकपमध्ये खेळल्याबद्दल 3 लाख रुपये वेगळी मॅच फीस देण्यात आली होती.